भैरवनाथ शुगर आलेगांव बु युनिट. 4 ता.माढा, जि. सोलापूर यांचा गळीत हंगाम 2021-22 सांगता समारंभ संपन्न

टेंभुुर्णीर (कटूसत्य वृत्त) :- माढा तालुक्यातील आलेगांव बु येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि., आलेगांव बु युनिटचा गळीत हंगाम 2021-22 सांगता समारंभ भैरवनाथ शुगर वर्क्स लि., ग्रुपचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांचे हस्ते पार पडला यावेळी साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावीक आलेगांव युनिटचे जनरल मॅनेजर सुरेश पाटील यांनी केले यावेळी चेअरमन प्रा. शिवाजीराव सांवत यांनी चालू गळीत हंगामामध्ये उच्चांकी 5,55,467 मे.टन इतके ऊस गाळप केलेबद्दल सर्व ऊस उत्पादक शेतकरी, वहातुकदार, ऊस तोडणी कामगार, कारखाना कर्मचारी व सर्व खाते प्रमुखांचे अभिनंदन केले व कारखान्याकडे विविध कामे करीत असलेल्या ठेकेदार व सर्व खाते प्रमुखांचे सत्कार करुन ऊस तोडणी वहातुक कामामध्ये जास्तीत जास्त ऊस वहातुक करणारे श्री कांतीलाल बापू टेळे व इतर ठेकेदारांचा सत्कार करुन बक्षिस वितरण केले तसेच करमाळा गटातुन सर्वात जास्त ऊस गाळपास आणले बद्दल श्री कवडे व श्री चोरमले ऍ़ग्री ओव्हरसिअर यांना 1 तोळा सोने बक्षीस देऊन सन्मान केला.
यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कंत्राटदार, साखर कामगार याच बरोबर आलेगांव ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब चंदनकर, पंढरीनाथ चंदनकर संतोष चंदनकर, तानाजी गाडे , विकास गाडे, भजनदास खटके, संतोष ढवळे, जिवन लांडे, अरुण गाडे, ऍ़ड. हरिश्चंद्र कांबळे, शिवाजी वावरे, नितीन रोंगे, लक्ष्मण सापते, रामचंद्र मेटे, आप्पासाहेब पाटील, अमित नलवडे, जनरल मॅनेजर सुरेश पाटील, प्रोसेस जनरल मॅनेजर पोपट क्षिरसागर, असि. जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ, चिफ अकौंटंट विठ्ठल काळे, को-जन मॅनेजर बसवेश्वर थळकरी, एमएससी बँक शितोळे, शेती अधिकारी विजय खटके, सुरक्षा अधिकारी शैलेश शिंदे, स्टोअर किपर सुधीर पाटील, असि. इंजिनीअर दिपक पाटील, ईडीपी मॅनेजर प्रविण बर्गे, ऊस पुरवठा अधिकारी तानाजी कदम हेडटाईम किपर सुमित साळुंखे, इले. इंजिनीअर निलेश देशमुख, सिव्हील विभाग प्रमुख राहुल खटके केनयार्ड सुपरवायझर रमेश लावंड, गोडावून किपर माने, आदी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आबासाहेब वाघ यांनी केले व आभार विजय खटके यांनी केले.
0 Comments