Hot Posts

6/recent/ticker-posts

पार्क स्टेडियमवर होणार लवकरच क्रिकेट सामने- आयुक्त पी. शिवशंकर

 पार्क स्टेडियमवर होणार लवकरच क्रिकेट सामने- आयुक्त पी. शिवशंकर

साेलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील महापालिकेच्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर क्रिकेट सामने आणि सराव सुरू करण्यासाठी स्टेडियम कमिटीची तत्काळ बैठक घेऊ, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.


स्मार्ट सिटी याेजनेतून सहा महिन्यांपूर्वी पार्क स्टेडियमचे सुशाेभीकरण पूर्ण झाले. या मैदानावर क्रिकेटचे सामने भरविण्यात यावेत, अशी मागणी सोलापूर जिल्हा क्रिकेट असाेसिएशनकडून करण्यात आली. दाेन महिन्यांपूर्वी महापाैर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महापाैर चषक भरविण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही. आता काेराेना निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले आहेत.


या पार्श्वभूमीवर पार्क स्टेडियमवर सामने भरविण्यात यावेत. सरावासाठी मैदान खुले करावे, अशी मागणी सोलापूर जिल्हा क्रिकेट असाेसिएशनकडून हाेत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, स्टेडियम कमिटीची तत्काळ बैठक घेऊ. या बैठकीत भाडे आकारणी, क्रिकेट सामने यावर निर्णय हाेईल. प्रशासनाच्या माध्यमातून महापालिका चषक भरविण्याची कार्यवाही हाेईल का?, असे विचारले असता, प्रयत्न करू, असेही पी. शिवशंकर यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments