स्त्री शक्ती महिला मंडळाच्या वतीने गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अन्नपूर्णा योजनेचा प्रारंभ

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-कै. सुशीलाबाई पाटील बहुउद्देशिय संस्था संचलित स्त्री शक्ती महिला मंडळाच्या वतीने गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली.यानुसार टेंभुर्णी मधील निराधार व असहाय्य व्यक्तींना पाडव्या निमित्त पुरणपोळी चे जेवण देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन स्त्री शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शीलाताई पाटील यांनी केले. प्रमुख उपस्थिती इंदापूर च्या नगरअध्यक्ष अंकिता शहा होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. स्त्री शक्ती महिला मंडळाच्या या कार्यक्रमाचे व अध्यक्षाचे सर्वच स्तरातून कौतुक केलं जातं आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता जगताप यांनी केले तर स्त्री शक्ती महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सुवर्णा भोसले, वैशाली शिंदे ,आशा घोळवे ,कुसूम फाळके ,जयश्री येवले- पाटील, मनीषा भोसले, भाग्यश्री पाटील, स्वाती गांधी, स्मिता भोसले ,सुप्रिया भोसले, अंजली अरगडे, शीला गायकवाड , हेमा चौधरी, नंदा मोरे, राणी मस्के, सुनीता सोनवणे, जयश्री ताबे, कुसूम रकटे, अंजु कांबळे , कुसुम लोंढे,आश्लेषा येवले- पाटील,रुपाली येवले-पाटील, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
0 Comments