सोलापूर ( कटूसत्य वृत्त):- येथील सलगरवस्ती पोलिस ठाण्यात cns हॉस्पिटल देगाव रोड, डाॅक्टर प्रसन्न कासेगवकर, यांनी कोविड काळात ऑक्सीजन प्लांट पुणे येथील braiks कंपनीकडून बसवला. तथापि त्यामध्ये बिघाड झाला. त्यामुळे कंपनीने कर्मचारी पाठवले तरी दुरुस्त न झाल्याने त्याची तपासणी केली व प्लांट निकृष्ट दर्जाचा असल्याचे अहवालावरून cns, हॉस्पिटलच्या मॅनेजर पाटील यांनी कंपनीचे विक्रेते केदार नायगावकर, निकेश सावरकर व स्वाती बावनकर रा.पुणे यांचे विरुद्ध 31/3/2022रोजी रात्री गुन्हा दाखल केला, तेव्हा चर्चेसाठी बोलावले म्हणून आलेल्या केदार नायगावकर व नीकेश सावरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस कस्टडीत ठेवले. सोमवारी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मे.पाटील-राठोडे यांच्या कोर्टात आरोपींना हजर केले. सुनावणी झाल्यानंतर मे.कोर्टाने आरोपींची प्रत्येकी10000/ च्या जतममुचलक्या व काही अटीवर जामीन अर्ज मंजूर केला. सदरच्या केसमध्ये कोर्ट कामकाजात आरोपी तर्फे अॅड.महेश जगताप व अॅड राजन दीक्षित यांनी योग्यती बाजू मांडल्याने आरोपीस जामीन मिळाल्याचे आरोपीकडून सांगण्यात आले.
0 Comments