Hot Posts

6/recent/ticker-posts

दत्त प्राथ. विद्यामंदिर बार्शी येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

 दत्त प्राथ. विद्यामंदिर बार्शी येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

         सोलापूर (कटूसत्य वृत्त): दि:-११/०४/२०२२ वार सोमवार रोजी दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेत महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दत्त प्राथमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.संगीता काळे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी युवराज जगताप तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.सुनील लंगोटे सर,श्री.मंगेश मोरे सर,श्री.श्रीकांत कुंभारे सर उपस्थित होते.

         कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. महात्मा फुले यांचे जीवन कार्य यावर आधारित माहिती श्री.सुनील लंगोटे सरांनी आपल्या मनोगतातून सांगितली कवी जगताप सरांनी महात्मा फुले यांच्यावर एक स्वरचित कविता सादर केली अध्यक्षीय मनोगतातून काळे मॅडम यांनी थोरांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपले आचरण ठेवावे असे सांगितले आभार श्री.मंगेश मोरे सर यांनी मानले सूत्रसंचालन श्री.सुनील लंगोटे सरांनी केले.

         सदर कार्यक्रमास श्री.युवराज जगताप सर,श्री.सुनील लंगोटे सर, श्री.श्रीकांत कुंभारे सर,श्री.मंगेश मोरे सर,श्रीम.संगीता काळे मॅडम आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments