Hot Posts

6/recent/ticker-posts

बहुमूल्य रत्नांपेक्षाही पुस्तके अनमोल असतात.” कवी रवि वसंत सोनार

बहुमूल्य रत्नांपेक्षाही पुस्तके अनमोल असतात.” कवी रवि वसंत सोनार

शब्दशिल्प वाचनालयास विविध पुस्तकांची स्नेहभेट...! 

          पंढरपूर (वृत्तसेवा) :- “ अनेक आशय - विषयांशी निगडित वैैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पुस्तके ही बहुमूल्य रत्नांपेक्षाही नक्कीच अनमोल असतात. ” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या संकल्पांतर्गत पुस्तक भेट पंधरवड्याच्या कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “ वेगवेगळी पुस्तके वाचनामुळे प्रत्येक वेळी पुस्तक वाचनानंतर वाचकांना एक प्रकारचा नावििन्यपूर्ण वैचारिक ठेवा मिळत असतो.”

          कवी रवि सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट पंधरवड्याच्या सहाव्या दिवशी सौ. सविता रवि सोनार आणि कवी रवि वसंत सोनार या दांपत्यांनी शब्दशिल्प वाचनालय पंढरपुरच्या ग्रंथालयासाठी स्नेहभेट स्वरुपात महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक मराठी लेखक - लेखिका, साहित्यिक, कवी आणि कवयित्री यांची वेगवेगळ्या प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पुस्तके मा. डिम्पलताई घाडगे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी मा. डॉ. मृदुला कुलकर्णी, मा. डॉ. उर्मिला जगताप, मा. अनुराधा हुमनाबादकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते. 

          रसिक वाचकांना मराठी भाषेतील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या वाचनाची गोडी लागावी म्हणून आणि वाचाल तर वाचाल यास अनुसरून साहित्य रसिक व कर्मचारी वृंद यांना बहुविध पुस्तके वाचावयास मिळण्यासाठी श्री. व सौ. सविता रवि सोनार या दाम्पत्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे पंढरपूर आणि परिसरातील लेखक साहित्यिक तसेच रसिक वाचकांकडून स्वागत व कौतुक होत आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक कवी - कवयित्री, कथाकार, कादंबरीकार, लेखक - लेखिका, रसिक वाचक यांनी विशेष सहकार्य केले. तर कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments