महाराष्ट्राशी निगड‍ित असणा-या धार्मिक व ऐतिहास‍िक ठिकाणी ‘भक्ती निवास’ व्यवस्था करण्याचा संकल्प - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 6, 2022

महाराष्ट्राशी निगड‍ित असणा-या धार्मिक व ऐतिहास‍िक ठिकाणी ‘भक्ती निवास’ व्यवस्था करण्याचा संकल्प

महाराष्ट्राशी निगड‍ित असणा-या धार्मिक व ऐतिहास‍िक ठिकाणी भक्ती निवास व्यवस्था करण्याचा संकल्प


महाराष्ट्र (कटूसत्य वृत्त): महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊल खुणा देशभर आढळतात. विशेषत्वाने मध्यप्रदेश, हर‍ियाणा, उत्तरप्रदेश याठ‍िकाणी उमटून दिसतात. अश स्थानांवर येणा-या भाविकांची तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून भक्ती निवास बांधण्‍याचा संकल्प उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर यांच्या मार्गदर्शनात पुढील काळात या कामासंबधी आखणी केली जाईल अशी, माहितीही त्यांनी योवळी दिली.

 

आमदार अधिक प्रभावीपणे संसदीय आयुधांचा वापर करतील

संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन महाराष्ट्रातील जवळपास 100 आमदारांसाठी करण्यात आले असून  संसदीय आयुधांचा वापर आमदार अधिक प्रभावीपणे करतील, अशी अपेक्षा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

  लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस (PRIDE), राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रविधान भवनमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील आमदारांसाठी 5 आणि 6 एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.  

आपल्या मतदार क्षेत्रातील प्रश्न, समस्या प्रभावीपणे सदनात मांडण्यात यावे, तसेच संसदीय नियमावलीची माहितीची जाणीव व्हावी यासाठी सदरील प्रशिक्ष‍ण शिबीराचा लाभ होईल, अशी आशा डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली. आमदारांकडून येणा-या सूचनेवरून भविष्यात विधीमंडळात देशातील चांगल्या खासदारांचे व्याख्याने आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवारी सकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याहस्ते या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी उपसभापती डॉ गोऱ्हे,  विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या.

आजच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, डॉ.

आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages