थुंकणे टाळल्यास सोलापूर शहर निरोगी होईल - वैशाली कडुकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 1, 2022

थुंकणे टाळल्यास सोलापूर शहर निरोगी होईल - वैशाली कडुकर

 थुंकणे टाळल्यास सोलापूर शहर निरोगी होईल - वैशाली कडुकर

                                      

न थुंकण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 5 हजार रिक्षांवर स्टिकर लावून जनजागृती

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आपलं शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक सोलापूरकर नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळले पाहिजे तरच शहराचा नावलौकीक वाढेल असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नो स्पीट मोहिम राबवण्यात आली त्याच अनुषंगाने शहरातील जवळपास 5 हजार रिक्षांवर जनजागृतीसाठी थुंकु नका चे स्टिकर लावण्याचा शुभारंभ रेल्वेस्टेशन येथील रिक्षा थांब्यावर डॉ.वैशाली कडुकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष डॉ.मिलिंद शहा, सचिव डॉ. तन्मंगी जोग, सचिव डॉ. संजय मंठाळे आदी उपस्थित होते.सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास टि बी चा प्रसार होतो त्यामुळे मानवी जीवन धो्नयात येते. अनेक शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालयात ठिक ठिकाणी थुंकल्याचे दिसून येते तसेच रस्त्यावरून जाताना अनेकजण हवेत आपला फवारा मारतात त्यामुळे इतरांना त्याचा त्रास होतो रोग पसरतात तर कधी कधी मोठे वाद भांडण होतात. या सर्वांवर एकच उपाय म्हणजे थुंकू नये प्रत्येकाने आपले कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून या नो स्पीट मोहिमेत सहभागी व्हावे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून हा चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामुळे सोलापूर आणि येथील नागरीकांना त्याचा फायदा होणार आहे असेही डॉ. कडुकर यांनी सांगितले.प्रारंभी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलिंद शहा यांनी नो स्पीट मोहिमेची माहिती दिली. सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्याचाच भाग म्हणून शहरातील सर्व रिक्षंावर नो स्पीटचे स्टिकर लावण्यात आले आहेत असेही डॉ.मिलिंद शहा यांनी सांगितले.सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छा केल्यास रोगांचा प्रसार जलद होतो त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सचिवा डॉ.तन्मंगी जोग यांनी सांगितले त्यानंतर रेल्वेस्टेशन परिसरातील रिक्षा स्टॉपवरील सर्वच रिक्षांवर न थुकण्याचे आवाहन करणारे स्टिकर लावण्यात आले. यावेळी डॉ. शांतीलाल सेठीया, रिक्षा संघटनेचे चंद्रकांत गायकवाड, पवार यांच्यासह रिक्षा चालक आणि रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते शेवटी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मंठाळे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages