Hot Posts

6/recent/ticker-posts

'मोदी सरकारने जनतेला 'एप्रिल फूल' करत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले' - संजय राऊत

 'मोदी सरकारने जनतेला 'एप्रिल फूल' करत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले' - संजय राऊत

मुंबई (कटूसत्य वृत्त):- देशभरात आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र यासोबतच सर्वसामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. कारण आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर लागू झाले आहेत.यंदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यात आतापर्यंत 346 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. याच महागाईच्या मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी टोला लगावला आहे की,'मोदी सरकारने जनतेला 'एप्रिल फूल' करत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले आहेत. अच्छे दिन येणार, तुमच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार, दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार दिला जाणार आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार या सगळ्या घोषणा म्हणजे 'एप्रिल फूल'च आहे.' असं म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments