ऊसतोडणी मजुरांना वाढीव खर्च पांडुरंग कारखाना देणार

श्रीपूर (कटूसत्य वृत्त):- ऊसतोडणीसाठी मजुरांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून पांडुरंग कारखाना १ एप्रिलपासून मजुरांना प्रतिमेट्रिक टन ५० रुपये जास्तीची मजुरी देणार आहे.अशा पद्धतीने वाढीव तोंडणी खर्च देणार राज्यातील पहिला पांडुरंग कारखाना ठरला आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी कारखान्याची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याचे काम केले आहे. ऊस उत्पादक सभासदांना शेतकऱ्यांच्या उसास प्रति मे.टन रुपये २७०० प्रमाणे ऊस दर दिला जाईल.तसेच ऊसतोडणी कामगारांना पन्नास रुपये प्रतिमेट्रिकटन ऊसतोडणी मजुरी स्तीचा दर देणार आहे.सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक सभासदांना शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याचे काम केले आहे. ऊसतोडणी मजुरांना मिळणारी मजुरी व कमिशन मिळून आता ३७६ रुपये तोडणी मजुरी मिळणार आहे. जळीत उसामुळे शेतकन्यांचे व कारखान्याचे मोठे नुकसान होते.यासाठी तोडणी खर्च देण्याचा निर्णय घेतल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.सभासद ऊस शेतकऱ्याकडे तोडणी मजुरांकडून पैशाची मागणी होऊ नये त्याचबरोबर ऊस जळीत करून कारखान्यात पाठवू नये.हा खर्च १ एप्रिलपासून लागू होणार असून, जे तोडणी मजूर शेतकऱ्याकडून पैसे घेणार नाहीत तसेच शेतक-यांनीसुद्धा पैसे दिले नाही पाहिजेत. शेतकऱ्यांना ऊस जळालेला नाही पाहिजे.अशा नियमावलीत बसणाऱ्यालाच हा तोडणी खर्च मिळणार आहे.
0 Comments