कर्नाटकातील अंगणवाडीची दूध पावडर सोलापुरात जप्त

जोडभावी पेठ पोलिसांची कारवाई : दोघांवर गुन्हा; १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कर्नाटक राज्यातील अंगणवाडीला पुरवली जाणारी मोफत दुधाची पावडर सोलापुरातून घेऊन जात असताना जोडभावी पेठ पोलिसांनी पकडण्यात आले .ही कारवाई केली असून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.संजीव लक्ष्मण मंजूळकर (वय ४०,रा. शिवाजी चौक, टिळक नगर,घाटकोपर, मुंबई), अनिल शंकर राठोड(रा. बोराबंडा तांडा हनुमान मंदिर जवळ,हैदराबाद यादगीर हायवे, ता. गुरमठकल,जि. यादगीर, राज्य कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संजू मंजूळकर याने सांगितले की, नॉट फॉर सेल लिहिलेली नंदिनी कंपनीची दुधाची पावडर असलेल्या मालट्रकचे मालक अनिल राठोड याच्या सांगण्यावरून ओळखीच्या कोणी तरी इसमाने चोरी केला. दुधाची पावडर असलेली मालट्रक विजापूर येथील ब्रिज खाली असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मालट्रक लावून निघून गेला.मालट्रकमध्ये चोरीचा माल आहे हे माहीत असताना, संजू मंजूळकर याने तो ताब्यात घेतला. मालट्रक घेऊन तो विजापूरहून सोलापुरात आला. २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता मालट्रक मार्केट यार्डसमोरील शिवदारे मंगल कार्यालयाजवळ थांबला होता.पेट्रोलिंगवर असलेल्या जोडभावी पेठच्या पोलिसांनी मालट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये 'नॉट फॉर सेल'लिहिलेले दूध पावडरचे पाकीट आढळून आले. मालट्रकमध्ये नऊ लाख रुपये किमतीची दूध पावडर व आठ लाख रुपये किमतीचा मालट्रक ताब्यात घेतला. पोलिसांनी चौकशी केली असता,चालकाने प्रथमत:डवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी मालट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments