विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा
सहायक आयुक्त कैलास आढे यांचे आवाहन
.jpeg)
.jpeg)
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- अनुसूचित जाती, मागासवर्गीय समाजातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रगती साधण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या योजना जाणून घ्याव्यात. योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधण्याचे आवाहन विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 6एप्रिल ते 16 एप्रिल 2022 दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्ताने शुक्रवारी भारती विद्यापीठाच्या समाजकार्य महाविद्यालयात भारत सरकार शिष्यवृत्ती व योजनेबाबत शहरातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे संशोधन अधिकारी सचिन कवले, समाजकार्य महाविद्यालयाच्या संचालिका जयश्री मेहता, चंदेली व वालचंद समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
0 Comments