Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तू जपण्याचे काम करणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तू जपण्याचे काम करणार - पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

 

सोलापूर, (कटूसत्य वृत्त): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला हेवा वाटावे असे होते. त्यांच्या कार्याची आठवण ठेवणे प्रत्येक नेत्याचे, समाजाचे कर्तव्य आहे. डॉ. आंबेडकर यांच्या प्रत्येक ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचे काम करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

वळसंग ता. दक्षिण सोलापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 साली उद्घाटन केलेल्या ऐतिहासिक विहीर परिसराच्या सुशोभीकरण आणि स्तूप बांधकाम भूमिपूजनप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सरपंच महानंद दुधगी, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, उपसरपंच स्वामी कुंडले, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, संतोष पवार, बाळासाहेब वाघमारे, शिवाप्पा चिंचोळे, दीपक गायकवाड, शांतीकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री. भरणे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुढच्या आठवड्यात जयंती आहे. त्यांच्या विचारांचे खूप मोठे योगदान आहे. डॉ. आंबेडकर यांची ऐतिहासिक वास्तू देशाने नोंद घ्यावी, अशी उभारण्याचे काम करणार आहे.

ऐतिहासिक विहीरीच्या कामासाठी एक कोटींचा निधी

वळसंग येथे बाबासाहेब आंबेडकर यांनी उदघाटन केलेली ऐतिहासिक विहीर असून या विहीरीच्या सभोवताली कंपाऊंड, काँक्रीट रोड आणि विहीरीवर स्तूप (चबुतरा) बांधण्यासाठी एक कोटी रूपये देण्याची घोषणा श्री. भरणे यांनी यावेळी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments