हनुमान जयंती निम्मित आरोग्य शिबिर, व दूध संघाचे चेअरमन पदी रणजित शिंदे यांचा भव्य सत्कार ; 128 रक्तदात्यांनी रक्तदान केले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 18, 2022

हनुमान जयंती निम्मित आरोग्य शिबिर, व दूध संघाचे चेअरमन पदी रणजित शिंदे यांचा भव्य सत्कार ; 128 रक्तदात्यांनी रक्तदान केले

 हनुमान जयंती निम्मित आरोग्य शिबिर, व दूध संघाचे चेअरमन पदी रणजित शिंदे यांचा भव्य सत्कार ; 128 रक्तदात्यांनी रक्तदान केले

          टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- दि १७ रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त मी वडार महाराष्ट्राचा संघटना व जय बजरंग ग्रुप यांच्यामार्फत टेम्भूर्णी मध्ये रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन पदी माननीय श्री रणजीत (भैया) शिंदे यांची निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमता सर्व मान्यवरांनी कै. सुनील महाराज धोत्रे व दैवत बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात केली. या दरम्यान आज हनुमान जयंती च्या निमित्ताने रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर सारखे कार्यक्रम घेणे म्हणजे खूप मोठे समाजकार्य आहे. स्वर्गीय सुनील महाराज धोत्रे हे नेहमी समाज प्रबोधनाचे काम करत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन वडार समाजाचे नेते अमोल धोत्रे (सर) व स्वर्गीय कै.सुनील महाराजांचे चिरंजीव कृष्णा धोत्रे हे समाजप्रबोधनाचे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांना यापुढे कोणत्याही प्रकारची समाजकार्यासाठी मदत लागली तर आम्ही स्वतः होऊन त्यांना मदत करू असे आश्वासन सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत(भैया) शिंदे यांनी दिले. या कार्यक्रमामध्ये 128 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या  कार्यक्रमासाठी रणजित भैया शिंदे ,प्रमोद कुठे, रावसाहेब देशमुख, महेंद्र  वाकसे,रामभाऊ शिंदे ,विठ्ठल कोळपे ,गणेश केचे शैलेश ओहोळ ,विजय देशमुख भाऊसाहेब महाडिक, जयवंत पोळ, विकास धोत्रे ,नितीन पाटील, यशपाल लोंढे, आकाश पाटील ,विलास देशमुख, प्रशांत देशमुख राजाभाऊ थोरात, बंकट गायकवाड ,देवराव सुकळे ,अंकुश काळे ,शिवराम पवार ,दीपक मंजुळे ,कैलास पवार ,सतीश जाधव ,सौरभ काळे ,सम्राट जाधव, मधुकर देशमुख, मयूर काळे, लक्ष्मण वरपे यांचे उपस्थित होते.

          या कार्यक्रमासाठी उपस्थित मी वडार महाराष्ट्राचा जिल्हासंपर्क प्रमुख दत्ता विटकर, जिल्हाकार्याध्यक्ष संजय गुंजाळ, महिला जिल्हाध्यक्ष सरस्वती पवार धनंजय गुंजाळ ,धोत्रे भाऊसाहेब , रामलिंग धोञे,सचिन चव्हाण, लक्ष्मण जाधव ,एकनाथ जाधव, शंकर जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अमर तांदळे, गणेश भाऊ चव्हाण, श्रीकांत मासुळे, गोपाळ पवार, आकाश पाटील, अक्षय काळे, लहू पवार, राम भारत पवार, शांतीलाल माने सुनिल पवार ,प्रतीक माने, बापू चव्हाण, दीपक मासुळे, हरी महाराज माने ,अनिल पवार, कालिदास पवार ,दादा माने, लखन गायकवाड, मयूर माने, सनी पवार, सागर पवार, विठ्ठल पवार ,भागवत यमपुरे, हरी पवार ,समाधान जाधव, केतन चौगुले, श्रवण पोळ ,तात्या कोळी, प्रेम जगताप ,माधव जगताप, मारुती मासुळे ,अण्णा धोत्रे, योगेश धोत्रे जॉकी सुर्वे हे उपस्थित होते.

          हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल सर धोत्रे व कार्यकर्ते, श्रीकांत मासुळे, कृष्णा धोत्रे, मनीष धोत्रे, गोपाळ पवार, प्रकाश धोत्रे ,दीपक मासुळे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages