संत निरंकारी मंडळ टेंभुर्णी यांच्या वतीने रक्तदान, मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- संत निरंकारी मंडळ शाखा टेंभुर्णी यांच्यावतीने रक्तदान शिबिरामध्ये २२८ रक्तदात्यांनी रक्तदान केले व मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये १३३ जणांची तपासणी करण्यात आले. येथील सुर्ली रोड वरील सत्संग भवन येथे १० एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प.पू. इंद्रपालसिंह नागपाल जी,झोनल इंचार्ज ,सोलापूर यांनी "रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे " याची प्रेरणा दिली. याप्रसंगी प्रमुख अतिथी माढ्याचे आमदार बबनरावजी शिंदे , यांनी संत निरंकारी मिशन करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी , करमाळा राजाराम भोंग, सरपंच प्रमोद कुटे, सहाय्यक पो.नि. सुशिल भोसले, माढा तालुका भाजपा अध्यक्ष योगेश बोबडे ,रावसाहेब देशमुख, अमोल धोत्रे सर, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, सतिश मेंगशेट्टि ,संभाजी पाटील ,नारायण भानवसे, वडार पॅंथरचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे, ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी विकास धोत्रे , गणेश केचे, विठ्ठल कोळपे, कुनाळे सर, गोरख देशमुख , पांडुरंग सावंत, रामभाऊ शिंदे ,गगन गोडसे , तानाजी सलगर , दिलीप काबंळे,सचिन पवार, किरण कदम ,प्रशांत गिड्डे , महादेव मांढरे , बाळासाहेब टोणपे,सागर लोकरे,अनिल आरडे, आदि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरी माने , कृष्णा धोत्रे, लहू नगरे, राजु धोत्रे, धनाजी वाघ , माऊली माने , विलास काळे , सुनिल पतुले ,शहाजी जाधव , बंडू माने , सुनिल पवार , सुनिल धोत्रे, उमेश कळपे , सौदागर कुटे , शरद नवले , शैलेश ओहोळ , अनिल माने, किशोर पवार , दत्तात्रय हुलगे , नवनाथ धोत्रे, नागनाथ धोत्रे, पिंटू पाटील , कांतीलाल नगरे , गोपाळ पवार,माणिक गायकवाड,सोमनाथ पवार, प्रतीक माने आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल पवार यांनी केले सुत्रसंचालन किरण पाटणकर यांनी केले.
0 Comments