Hot Posts

6/recent/ticker-posts

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा निश्चय दौरा

 युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा निश्चय दौरा 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- युवा सेना सचिव सन्मा . वरुण सरदेसाई आणि संपर्क प्रमुख आ . तानाजी सावंत व युवा सेना कोअर कमिटी या प्रसंगी उपस्थित राहणार असून संपुर्ण महाराष्ट्रभर युवासेना निश्चय दौरा आयोजित करण्यात आलेला असून दिनांक २८/०३/२०२२ रोजी , वार सोमवार सकाळी ११ वाजता , हुताम स्मृती मंदिर येथे युवासेनेचे शहर व जिल्हा युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा ठावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात सोलापूर विद्यापीठ सिनेट निवडणुक , तसेच आगामी काळातील सर्व स्तरावरील निवडणुका संदर्भात मेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्याचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी केले असून मेळाव्यास शिवसेना- युवासेना , युवतीसेना सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे . या पत्रकार परिषदेस युवासेना उपजिल्हाप्रमुख अॅड . दयांनद शिंदे , उपशहर प्रमुख अर्जुन शिवसिंवाले व भारतीय विद्यार्थी सेना माजी शहर प्रमुख सुजित खुर्द आदी उपस्थित होते.



Reactions

Post a Comment

0 Comments