कुरुल ते पंढरपूर रस्ता दुरूस्तीसाठी तातडीने २० कोटचा निधी मजुर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 22, 2022

कुरुल ते पंढरपूर रस्ता दुरूस्तीसाठी तातडीने २० कोटचा निधी मजुर

कुरुल ते पंढरपूर रस्ता दुरूस्तीसाठी तातडीने २० कोटचा निधी मजुर 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सार्वजनिक बांधकाम मंत्री ना अशोक चव्हाण यांच्या दालनात बैठक आमदार यशवंत (तात्या)माने यांची माहिती.मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कूरूल ते पंढरपूर रस्ता दुरुस्ती करण्याची गेली अनेक वर्ष नागरिकांची मागणी होती या मागणीला शासन स्तरावरून पाठपुरावा करून मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार यशवंत माने यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विशेष महत्त्वाचा प्रश्न म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निधीची मागणी केली होती . त्यानंतर काल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,आ. बबनदादा शिंदे,आमदार यशवंत(तात्या)माने व मुख्य सचिव यांच्यात मुंबई येथे बैठक संपन्न. मोहोळ तालुक्यातील कुरुल ते पंढरपूर ३५ किमी अंतर असलेला रस्ता ADB टप्पा २ मध्ये समाविष्ट केलेला आहे.परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कालावधी लागणार आहे. सध्या नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता रस्त्याची दुरवस्था पाहुन आमदार बबनदादा शिंदे व आमदार यशवंत(तात्या)माने यांनी तात्काळ रस्त्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री  अशोक चव्हाण यांच्या कडे करताच दुरूस्तीसाठी विशेष दुरूस्ती योजनेअंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार(दि २२) रोजी मुंबई येथे मंत्रालयात आ. बबनदादा शिंदे,आ. यशवंत(तात्या)माने व मुख्य सचिव साळुंखे,मुख्य अभियंता राजभोज यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला आहे.यावेळी आ. यशवंत(तात्या)माने यांनी सांगितले कि बैठकी दरम्यान झालेल्या चर्चाअंती कुरुल ते पंढरपूर ३५ किमी रस्तासाठी ५० कोटीची आवश्यकता आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दुरूस्तीसाठी २० कोटी चा निधी विशेष दुरूस्ती योजनेअंतर्गत देण्याची ग्वाही दिली असून सुरुवातीला खडीकरण तसेच MPM चे दोन थर घेऊन दुरूस्ती केली जाईल व उर्वरित कारपेट व शिलकोट या कामासाठी पुरवणी बजेट मध्ये निधी देण्याचे सा बां मंत्री ना.अशोक चव्हाण यांनी दिला आहे अशी माहिती आ. यशवंत(तात्या)माने यांनी भ्रमणध्वनीद्वारे माध्यमांची दिली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages