बारावीची परीक्षा चक्क मोठ्या भावाने दिल्यामुळे मोठी खळबळ, असं फुटले बिंग, दोघांवर गुन्हा दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 22, 2022

बारावीची परीक्षा चक्क मोठ्या भावाने दिल्यामुळे मोठी खळबळ, असं फुटले बिंग, दोघांवर गुन्हा दाखल

 बारावीची परीक्षा चक्क मोठ्या भावाने दिल्यामुळे मोठी खळबळ, असं फुटले बिंग, दोघांवर गुन्हा दाखल


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बारावीची परीक्षा चक्क मोठ्या भावाने दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दयानंद कॉलेजचे उपप्राचार्य अरूण खांडेकर यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. चैतन्य अंगद पवार (वय १८) आणि योगेश अंगद पवार (वय २२ ) अशी या दोघा भावांची नावे आहेत. दरम्यान, लहान भाऊ चैतन्य पवार याचा अभ्यास न झाल्याने त्याच्याऐवजी त्याचा मोठा भाऊ योगेशने त्याच्या बारावीच्या परीक्षेचा पेपर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोघांचा हा प्रयत्न फसला असून, त्यांना आता जेलची हवा खावी लागेल हे मात्र तितकंच खरं.विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर फोटो संशयास्पद वाटल्याने त्याची तपासणी करण्यात आली दयानंद कॉलेजचे उपप्राचार्य अरूण खांडेकर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १९ मार्च रोजी अर्थशास्त्राचा पेपर होता. या पेपरची वेळ दुपारी ३ वाजून ३० मिनिटाची होती. दयानंद आर्टस अ‍ॅन्ड सायन्स कॉलेजमध्ये सदर पेपर सुरु होता. यादरम्यान, खोली क्रमांक १०६ मध्ये पर्यवेक्षक तपासणी करत असताना , परीक्षार्थी रोल क्रं. पी- १५६४१७ या विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर फोटो संशयास्पद वाटला असल्याने त्यांनी त्याची बारकाईने तपासणी केली. मात्र, हॉल तिकीटावरचा फोटो पुन्हा संशयास्पद वाटला. त्याचबरोबर त्या रोल नंबरवर चैतन्य अंगद पवार याने परीक्षा देणे गरजेचे असताना चैतन्य ऐवजी त्याचा मोठा भाऊ योगेश पवार हा परीक्षा देत होता. असं स्पष्ट झाले. पर्यवेक्षकाला संशय आल्याने त्याचे बिंग फुटले. यापूर्वीर्ही योगेश याने बोर्डाची तोंडी परीक्षा व इंग्रजीचा पेपर तसेच सध्या बारावीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर योगेश याने स्वत: तोतया विद्यार्थी म्हणून दिल्याचे उघड झाल्याने केंद्रावर देखील मोठी खळबळ उडाली होती.चैतन्य याचे हॉलतिकीट घेऊन उत्तर पत्रिका लिहून परीक्षा हजेरी पत्रकावर चैतन्य पवार याची बनावट सही केली.खांडेकर यांच्या फिर्यादीवरून चैतन्य पवार व योगेश पवार या पवार बंधूविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास जोडभावी पोलिस करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर हजेरी पत्रकावर सही करून चैतन्य याचे हॉलतिकीट घेऊन उत्तर पत्रिका लिहून परीक्षा हजेरी पत्रकावर चैतन्य पवार याची बनावट सही केली. व बारावी पुणे बोर्डाची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages