हवेली तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी विजयराव टिळेकर पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

हवेली तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी विजयराव टिळेकर पाटील

 हवेली तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी  विजयराव टिळेकर पाटील



हवेली (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ वतीने हवेली तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी टिळेकर वाडी गावचे पोलीस पाटील श्री विजयराव टिळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष  बाळासाहेब  शिंदे पाटील कार्यक्रमाचे उद्घाटक थेऊर कारखान्याचे मा. उपाध्यक्ष माननीय   राजेंद्र टिळेकर त्याचप्रमाणे टिळेकर वाडी ग्रामपंचायत मध्ये  विजयराव टिळेकर यांच्या पोलीस पाटील कार्यालयाचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राजेंद्र मोकाशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक  राजेंद्र टिळेकर यांनी गावातील राजकीय सामाजिक व विकास कामाबद्दलची माहिती दिली त्याचप्रमाणे सर्व पोलीस  पाटलांचे स्वागत केले.पश्चिम महाराष्ट्र महिला पोलीस पाटील संघाच्या अध्यक्ष सौ तृप्तीताई मांडेकर यांच्या वतीने सर्व महिला ना सन्मानचिन्ह देण्यात आले.राज्याचे अध्यक्ष  बाळासाहेब शिंदे पाटील यांनी पोलीस पाटलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले मानधन वाढ प्रवास भत्ता पोलीस पाटलांना कार्यालय यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी आपल्या मनोगतामध्ये पोलीस पाटील हा शासनाचा प्रशासकीय दुवा म्हणून काम करत असतो. त्यामुळे  पोलीस पाटलांचा योग्य तो सन्मान राखावा. पोलीस पाटलांनी प्रशासकीय कामाबरोबरच सार्वजनिक जबाबदारीचे ही काम करावे. श्रीमंत मोकाशी यांनी व्यक्त केले. यावेळी मंडलाधिकारी  नुरजहा सय्यद हवेलीच्या उपसभापती श्रीमती हेमलता ताई बडेकर टिळेकर वाडी चे तलाठी भाऊसाहेब  जवळकर ग्रामसेवक  सुनील लोणकर असंख्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी तृप्तीताई मांडेकर जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा पाटील काळभोर हर्षदा सपकाळ नवनिर्वाचित अध्यक्ष विजयराव टिळेकर यांनी मनोगते व्यक्त केले.  संपूर्ण प्रास्ताविक टिळेकर वाडी चे मा.उपसरपंच सुभाषराव टिळेकर यांनी केले. उपस्थितांमध्ये महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा प्रतिनिधी  पोलीस पाटील महिला आघाडी सर्व तालुके व हवेली तालुका कार्यकारिणी व सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.सर्वांचे आभार हवेली तालुका पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रेय चौधरी पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages