तहसिलदार चव्हाणांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शिवसेना नेते कोकाटेंनी केली मागणी
माढा (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे तहसिलदार म्हणून कार्यरत असलेल्या राजेश चव्हाण यांच्या भ्रष्टाचाराची व मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मुख्य सचिव यांच्याकडे माढा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना नेते संजय (बाबा) कोकाटे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राजेश चव्हाण हे मार्च २०१९ पासून माढा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत त्यांनी अत्यंत मनमानी व भ्रष्टाचारी पध्दतीने कारभार केला असून नवीन शर्थीचे जमिनीचे खरेदीखत करण्यासाठी लॉक ओपन करून खरेदी केलेल्या आहेत. (उदा.दहिवली तालुका माढा येथील नवीन शर्तीच्या जमिनीची खरेदी केलेली आहे.), गुंठेवारीस बंदी असताना अति मोठय़ा प्रमाणात खरेदी विक्री व्यवहार करून त्यांच्या नोंदी प्रमाणित केलेल्या आहेत. अर्थपूर्ण संबंध ठेवून गौण खनिजाच्या चोरीकडे मुद्दामहून दुर्लक्ष केलेले आहे. तडजोडी करून कारवाया केल्या आहेत. (उदा.चार ब्रास वाळू पकडली कि एक ब्रास वर दंडात्मक कारवाई करायची व बाकीची तडजोड करायची) शेती रस्त्यासाठीच्या तक्रारीमध्ये जोपर्यंत आर्थिक पूर्तता होत नाही, तोपर्यंत जाणीवपूर्वक विलंब लावणे. (तक्रारीची दाखल दिनांक व निर्णयाचा दिनांक तपासावा) शासकीय अन्न धान्य वितरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता. ८५ खालील प्रकरणांमध्ये (खातेफोड व गट विभाजन)यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून कार्यकाळातील संपूर्ण प्रकरणाची तपासणी करणे. माढा तालुक्यातील महसूल खात्यातील कुठलेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही या सर्वांना तहसीलदार यांचा अर्थपूर्ण पाठींबा यामुळे सामान्य जनतेस प्रचंड त्रास होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
वेळेत कार्यालयात न थांबणे व कार्यालयाची वेळ संपल्यानंतर विशिष्ट कर्मचाऱ्यांना घेऊन बेकायदेशीर कामे करणे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यालयाचा दूरध्वनी बंद आहे. तसेच त्यांचा स्वतःचा मोबाइल ही कायम बंद असतो व ऑफिसमध्ये चौकशी केल्यास साहेब दौऱ्यावर आहेत म्हणून सांगितले जाते. त्यामुळे तालुक्यातील जनतेस हेलपाटे मारावे लागतात. विविध विभागांतील अत्यल्प दप्तर तपासणीचा अर्थ भ्रष्ट कर्मचारी यांना पाठीशी घालणे दप्तर तपासणीच्या व हलचल रजिस्टरची तपासणी करणे.
या 10 मुद्यांची सक्षम अधिकार्यांमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. तसेच राजेश चव्हाण यांनी भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या संपत्तीतून निर्माण केलेल्या चल व अचल संपत्तीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत कामकाजापासून दूर ठेवावे अशीही मागणी कोकाटे यांनी केली आहे.
Post Top Ad
Tuesday, March 1, 2022
Home
Unlabelled
तहसिलदार चव्हाणांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शिवसेना नेते कोकाटेंनी केली मागणी
तहसिलदार चव्हाणांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शिवसेना नेते कोकाटेंनी केली मागणी
Share This
About Katuysata
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
No comments:
Post a Comment