सोलापूरच्या चार तरूणी युक्रेनमधून परतल्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

सोलापूरच्या चार तरूणी युक्रेनमधून परतल्या

 सोलापूरच्या चार तरूणी युक्रेनमधून परतल्या


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर-ग्रामीणमधील ३१ तरुण-तरुणी युक्रेनमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने गेले आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर घाबरलेल्या त्या तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. रविवारी (ता. २७) जिल्ह्यातील चार मुली त्यांच्या घरी सुखरूप पोहचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. वैद्यकीय शिक्षणाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील २० मुले व ११ तरुणी युक्रेनमध्ये वास्तव्यास आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर असंख्य लोकांनी जीव वाचविण्याच्या निमित्ताने युक्रेनमधून स्थलांतर केले आहे. रशियाने अजूनही हल्ला सुरुच ठेवला आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकार भारतीतील तरूण-तरुणींना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात महाराष्ट्रातील जवळपास बाराशे तरुण-तरुणी असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील ३१ जणांचा समावेश आहे. त्यामध्ये सांगोल्यातील चार, सोलापूर शहरातील पाच, पंढरपूर तालुक्‍यातील नऊ, मोहोळ तालुक्‍यातील दोन, मंगळवेढ्यातील पाच, बार्शीतील तीन आणि माढा, दक्षिण सोलापूर व करमाळ्यातील प्रत्येकी एक तरुण युक्रेनमध्ये आहेत. त्यातील आतापर्यंत ‘ऑपरेशन गंगा’च्या माध्यमातून त्यांना मायदेशी आणले जात आहे. सुप्रिया खटकाळे (मंगळवेढा), सलोनी गेंगाणे (रा. कोरवली, ता. मोहोळ), अंकिता अनिल शहापुरे (जुळे सोलापूर), ऋतुजा बाबासाहेब कबाडे (रा. एखतपूर, ता. सांगोला) या चौघी त्यांच्या घरी सुखरूप पोहचल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्‍तीसागर ढोले यांनी दिली. शिक्षणाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ३१ तरुण-तरुणी युक्रेनमध्ये आहेत. त्यातील चार मुली आज (रविवारी) त्यांच्या घरी सुखरूप परतल्या आहेत. अजून २७ जण युक्रेनमध्येच असून काही दिवसांत तेही सुखरूप परत येतील.
- शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages