पुढील आठवड्यात इंधन दरवाढीचा भडका? निवडणुका संपणार असल्याने शक्यता बळावली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 2, 2022

पुढील आठवड्यात इंधन दरवाढीचा भडका? निवडणुका संपणार असल्याने शक्यता बळावली

 पुढील आठवड्यात इंधन दरवाढीचा भडका? निवडणुका संपणार असल्याने शक्यता बळावली



नवी दिल्ली (वृत्त सेवा):-  पुढील आठवड्यात राज्याच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेल्याने पेट्रोलचा दर किमान लिटर मागे किमान 9 रूपयांपर्यंत वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.२०१४ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११० डॉलर्सवर पोहोचल्या होत्या. १  मार्च ला या किंमती १०२  डॉलर्सच्या पातळीवर स्थिरावल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात कच्चा तेलाची किंमत ८१  डॉलर्स इतकी होती. त्यातच कच्चा तेलाच्या पुरवठ्यात युक्रेन संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर विस्कळीतपणाही येऊ शकतो ही भीती आहे. इंधनाच्या किंमती दैनंदिन स्वरूपात जाहीर करण्याची प्रथा असली तरी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारकडून तेल दरवाढ थांबवली जाते. पण आता पाच राज्यांतील निवडणूक प्रक्रिया ७  मार्च रोजी संपणार असल्याने त्यानंतर तेल कंपन्यांना या दरवाढीला अनुमती दिली जाईल.तेल कंपन्या सध्याच्या कच्चा तेलाच्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत प्रतिलिटर ५  रूपये ७०  पैसे इतका तोटा सहन करीत आहेत. हा तोटा भरून काढून तेल कंपन्यांना पुर्ववत पातळीवर नफा मिळवायचा असेल तर इंधनाच्या दरात त्यांना किमान दहा टक्के म्हणजे सरासरी प्रतिलिटर ९   रूपये इतकी वाढ करावी लागणार आहे. तेल कंपन्यांनी गेल्या सुमारे ११८  दिवसांत इंधनाची दरवाढ केलेली नाही.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages