शिरभावी येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 21, 2022

शिरभावी येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

 शिरभावी येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न



सांगोला (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले.सदर रक्तदान शिबीराचे उदघाटन सरपंच,उपसरपंच,शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाले. शिरभावी येथे सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा शिवजयंती उत्साही वातावरणात आणि विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. समाजोपयोगी कार्यक्रम राबवून शिवजयंती साजरी केल्यामुळे जयंती उत्सव मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सदर रक्तदान शिबीरात युवक आणि महिलानी ही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने या वर्षी ही रक्तदान शिबिर आयोजित केला होता."शिवजयंती घराघरात"या संकल्पने नुसार आम्ही शिवजयंती साजरी केली आहे. येणाऱ्या काळातही असे समाजोपयोगी कार्यक्रम राबवून  शिवजयंती साजरी करणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages