आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भारतीय जनता पक्ष ताकतीने लढवणार - चेतनसिंह केदार सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भारतीय जनता पक्ष ताकतीने लढवणार - चेतनसिंह केदार सावंत

 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भारतीय जनता पक्ष ताकतीने लढवणार - चेतनसिंह केदार सावंत





सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यात भारतीय जनता पक्षाची बूथ रचना सक्षम आहे. येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणूका कार्यकर्त्‍यांच्‍या आहेत. या सर्व निवडणूका भारतीय जनता पक्ष ताकतीने लढवणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतसिंह केदार सावंत यांनी केले. भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
      आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणूका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, एन. वाय. भोसले, बाळाप्पा येलपले, नागेश जोशी, अभिमन्यू पवार, शिवाजी आलदर, विष्णू सरगर, दिलीप कोळेकर, हरी आलदर, लक्ष्मण येलपले,निलेश मदने, देविदास कांबळे,भाऊ पाटील, जोतीराम माने, विकास वलेकर, संजय केदार, शंभू माने, विजय ननवरे, मानस कमलापुरकर,  प्रविण जानकर,  प्रसाद फुले, कृष्णा कांबळे, श्रीनिवास क्षिरसागर, महेश घाडगे, राहुल मंडले, बाळासो शिंदे, सागर मोरे, विशाल कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
    यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतसिंह केदार सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीसरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळ, टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, राष्ट्रीय महामार्ग यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकासकामांना चालना दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वकांक्षी किसान रेल्वे सांगोला येथून सुरू केली. आज किसान रेल्वेला ५० टक्के उत्पन्न सांगोला येथून मिळत आहे. शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आतापर्यंत फक्त भाजपने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. कोरोनाच्या संकट काळात गोरगरीब जनतेला मोदी सरकारने मोफत धान्य दिले. कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे. उमेदवारी कोणालाही मिळो भाजपचा उमेदवार विजय होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप मोठ्या ताकदीने लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सांगोला तालुक्यात भारतीय जनता पक्षाची बूथ रचना सक्षम असून शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बैठका घेऊन नियोजन करावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, बाळाप्पा येलपले, माणसं कमलापुरकर, विकास वलेकर यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश मदने सर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages