सिटी सर्व्हे नोंद अन् मालमत्ता उतारा मिळवून देण्यासाठी आमदारांसमक्ष जिल्हाधिकाऱ्यांची बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 17, 2022

सिटी सर्व्हे नोंद अन् मालमत्ता उतारा मिळवून देण्यासाठी आमदारांसमक्ष जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

 सिटी सर्व्हे नोंद अन् मालमत्ता उतारा मिळवून देण्यासाठी आमदारांसमक्ष जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

                                           

बार्शी (कटूसत्य वृत्त):- शहराच्या सुभाष नगरमधील सिटी सर्व्हे नंबर १५४४ जयशंकर मिल समोरील लहुजी चौक या ठिकाणच्या ब्रिटिश काळापासून रहिवास असलेल्या नागरिकांची सिटीसर्व्हे मध्ये नोंद होऊन त्यांना मालमत्ता उतारा मिळावा यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर भेट घेतली. यावेळी, संबंधित अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत वरील ठिकाणच्या रहिवाशांचा सिटी सर्व्हे उतारा नोंद होण्याबाबत सविस्तरपणे चर्चा झाली असून, उर्वरित कायदेशीर बाबी व प्रक्रिया यांची पूर्तता करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्याची माहिती आमदार राऊत यांनी दिली. या बैठकीस बार्शी तालुक्याचे तहसीलदार सुनील शेरखाने, महसूल विभाग सोलापूरचे नायब तहसीलदार संदीप लटके, भूमी अभिलेख कार्यालय बार्शीचे नरेंद्र झांबरे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, माजी नगरसेवक किरण तौर उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages