शिवजयंती उत्सव शांततेत अन् नियमांचे पालन करून साजरा करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 17, 2022

शिवजयंती उत्सव शांततेत अन् नियमांचे पालन करून साजरा करा

 शिवजयंती उत्सव शांततेत अन् नियमांचे पालन करून साजरा करा


बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी शहर पोलीस ठाण्यात 14 फेब्रुवारी रोजी बार्शी शहर पोलीस स्टेशन व बार्शीतील शिवभक्तांची शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्यामध्ये बार्शी शहरात गेल्या सात वर्षापासून निघत असलेल्या पालखी सोहळा संदर्भात प्राध्यापक किरण गाढवे यांनी इतंभ्यूत माहिती बार्शी पोलिसांना दिली. त्यामध्ये गाढवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या सात वर्षापासून ही बार्शीतील पालखी सोहळा निघत असून हा पालखी सोहळा अत्यंत दिमाखात व महाराष्ट्राला आदर्श घडवेल असा पालखी सोहळा निघतो. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला जात नसून डीजे डॉल्बी लावला जात नाही. सर्व शिवभक्त दोन रांगेमध्ये चालत असून बारा बलुतेदार ही पालखी आपल्या खांद्यावर घेऊन बार्शीतील प्रत्येक चौकातून याची परिक्रमा होते व या पालखीवर पुष्प वर्षाव केला जातो.
पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी प्रशासकीय नियमाची माहिती सर्व शिवभक्तांना दिली. यावेळेस शिवजयंतीनिमित्त ट्रिपल सीट फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई केली जाईल. तसेच गाड्यांच्या कर्कश्य आवाज करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत. शिवजयंती ही साजरी झालीच पाहिजे परंतु कोरोना व ओमिक्रोन अजून संपूर्ण नाहीसा झालेला नसून सर्वांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे, जास्त गर्दी न करता कमी स्वरूपात चांगली शिवजयंती साजरी करा. प्रशासनाकडून मिरवणुक न काढण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळेच मिरवणुकी संदर्भात परवानगी अद्याप तरी मी देऊ शकत नाही, असेही शेळके यांनी म्हटले. बार्शी पोलीस प्रशासन आपल्यासोबत आहे व आपण एकत्रित शिवजयंती साजरी करूया, असे आवाहनही शेळके यांनी शिवभक्तांना केले. दरम्यान, ही बैठक बार्शी शहर पोलीस उपविभागीय अधिकारी नालकुल तसेच बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, पोलीस उपनिरीक्षक कर्नेवाड यांच्या उपस्थितीत पार पडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages