Ads

Ads Area

संभाजी ब्रिगेड गोवा विधानसभा निवडणुकीत निर्णयाक पक्ष ठरणार- गायकवाड

 संभाजी ब्रिगेड गोवा विधानसभा निवडणुकीत निर्णयाक पक्ष ठरणार- गायकवाड 


गोवा (वृत्त सेवा):- देशाचे लक्ष्य लागलेल्या आणि प्रमुख पक्ष्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत बऱ्याच स्थानिक पक्षासह इतर राज्यातील राजकीय पक्ष देखील ताकतीने उतरले आहेत. गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  संभाजी ब्रिगेड तर्फे मँड्रेम, शिवोली, शिरोडा या तीन विधासभा मतदार संघात अधिकृत उमेदवार दिले आहेत. तसेच इतर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवारांनी देखील संभाजी ब्रिगेडशी संपर्क साधून सहकार्याची विनंती केली आहे. संभाजी ब्रिगेड तर्फे उमेदवारांची चाचपणी करून अपक्ष सुशिक्षित उमेदवारांना ताकद देत संपूर्ण सहकार्य करण्याचे नियोजन सुरु आहे. गोव्यातील राजकीय वातावरण बदलण्यासाठी व गोव्यातील या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड हा निर्णयाक पक्ष ठरण्यासाठी पुरूषोत्तम खेडेकर व गोव्यातील राजकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच मोर्चे बांधणी केली असल्याची माहीती निवडणूक निरीक्षक इंजि. मनोजकुमार गायकवाड यांनी दिली.


गोवा निवडणूक प्रभारी शिवश्री रुपेश पाटील, गोवा प्रेदेशाध्यक्ष रेजिनाल्ड डिकोस्टाजी, निवडणूक निरीक्षक इंजि. मनोजकुमार गायकवाड, निवडणूक समानव्यक ऍड. सुनील वाडेकर यांनी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोजदादा आखरे, महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असल्याचेही शेवटी सांगितले.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close