Ads

Ads Area

स्पर्धेच्या युगात सक्षम बनविण्यासाठी अबॅकसची ही काळाची गरज -प्रा.वैजिनाथ दळवी

 स्पर्धेच्या युगात सक्षम बनविण्यासाठी अबॅकसची ही काळाची गरज -प्रा.वैजिनाथ दळवी


माढा (कटूसत्य वृत्त):- ज्ञानदिप सुपर फास्ट अबॅकसच्या वतीने घेण्यात आलेल्या अबॅकस परिक्षेत ६७ विद्यार्थी बसलेले होते.त्यापैकी ६० विद्यार्थांना सुवर्ण ५ विद्यार्थ्यांना रजत व २ जणांना कास्य पदक व प्रमाणपञ प्राप्त झाले. ही परीक्षा ही २०० गुणांची असून त्यासाठी फक्त पंधरा मिनिटे वेळ असतो.सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक वैजिनाथ दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. माढा मध्ये एकमेव अबॅकसचे वर्ग गेली ६ वर्षे झाले प्रा.वैजिनाथ दळवी यांच्या  मार्गदर्शनाखाली  चालू आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अबॅकस च्या माध्यमातून शिक्षण देऊन त्यांचा बुद्ध्यांक वाढवून त्यांना पुढील स्पर्धेच्या शिक्षणासाठी सक्षम बनविण्यासाठी अबॅकस हे काळाची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. इयत्ता पहिली ते सातवी च्या सर्व माध्यमातील शिकणाऱ्या मुलांना या मध्ये प्रवेश घेता येतो. अबॅकस मुळे विद्यार्थ्यांची गणितात आवड निर्माण होते तसेच त्यांची एकाग्रता स्मरणशक्ती आकलनशक्ती  एकूणच ! बुद्ध्यांक वाढ व आत्मविश्वास वाढ ही घडून येते आणि आताच्या या स्पर्धेच्या युगात हे सर्व गुण विद्यार्थ्यांमध्ये असणे काळाची गरज आहे.यासाठी प्रा.वैजिनाथ दळवी, रेश्मा कदम यांचेही मार्गदर्शन व  सहकार्य  लाभले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close