Hot Posts

6/recent/ticker-posts

उज्वला शिंदे - नाईकवाडी मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

 उज्वला शिंदे - नाईकवाडी मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण  


मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' महाराष्ट्र राज्य आयोजित प्राध्यापक परीक्षेमध्ये कु. उज्वला बाळू शिंदे उर्फ  सौ उज्वला राहुल नाईकवाडी या मराठी विषयात सेट  परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. या अगोदर त्या  डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत त्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती MJPRF-2021 मिळाली आहे. या अगोदर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ्, सोलापूरच्या एम.ए. मराठी या अभ्यासक्रमात २०१९ मध्ये सुवर्णपदक मिळवले होते. त्यांची विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रम निवड समितीचे निमंत्रित सदस्या म्हणून निवड करण्यात आली होती. सध्या त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे एस. एस. ए. आर्टस अॅन्ड कॉमर्स कॉलेज, सोलापूरचे प्राचार्य प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी यांच्या मार्गदर्शनात मराठी विषयात पीएच.डी. (संशोधन) करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढाचे प्राचार्य डॉ एन बी पवार, प्राध्यापकवर्ग व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरचे प्राचार्य प्राध्यापकवर्ग, श्रीहरी सार्वजनिक वाचनालय, वडाचीवाडी, ता.मोहोळ, ग्रामस्थ आणि विद्युत तज्ञ राहुल  नाईकवाडी सुनिल नाईकवाडी, उर्मिला नाईकवाडी, बाळू भिवा शिंदे व समस्त शिंदे परिवार आदींनी अभिनंदन केले.त्या विद्युत तज्ञ राहुल नाईकवाडी यांच्या पत्नी आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments