Hot Posts

6/recent/ticker-posts

जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या अध्यक्षपदी पुनश्च कमलाकर दावणे

 जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या अध्यक्षपदी पुनश्च कमलाकर दावणे 


सरचिटणीसपदी मच्छिंद्र शेंडगे यांची निवड

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना  माढा तालुका शाखेचे पुनर्गठन  जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या कुर्डुवाडी येथील सभागृहात जिल्हा निरीक्षक अर्जुन पिसे, जिल्हा सहकोषाध्यक्ष शिवानंद बारबोले, जिल्हा प्रवक्ते ज्ञानेश्वर चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष सचिन क्षीरसागर पांडुरंग वाघ, संपत मिसाळ  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी कमलाकर दावणे यांची पुनश्च निवड करण्यात आली तर सरचिटणीस पदी मच्छिंद्र शेंडगे यांची निवड करण्यात आली. नुतन तालुका कार्यकारिणीत तालुका नेतेपदी दिनेश उरमोडे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गरदडे, बालाजी ढेंबरे,कार्याध्यक्षपदी संजय सोनवणे,कोषाध्यक्षपदी सोमनाथ कांबळे, ,संपर्कप्रमुखपदी संतोष भोरे, प्रसिद्धीप्रमुखपदी दत्तात्रय भालेराव, तालुका संघटकपदी निलेश देशमुख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदी शुभांगी सुरवसे -कावळे,सरचिटणीस वृषाली भोसले, उपाध्यक्षपदी कृष्णाबाई सावंत यांच्या निवडी  सर्वानुमते करण्यात आल्या. महसूल, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास यासह विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जुन्या पेन्शनचा लढा अधिक तीव्र करणार असल्याचे यावेळी कमलाकर दावणे यांनी सांगितले.  सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे आमदार  बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे,गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, विस्ताराधिकारी बंडू शिंदे,शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, सरचिटणीस,पदाधिकारी, पेन्शन फायटर्स,शिक्षक बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments