अध्यापक विद्यालय एखतपुर येथील प्रणवराज शेटे D.el.ed ( डी. एड) परीक्षेत सांगोला तालुक्यात प्रथम
नाझरे (कटूसत्य वृत्त):- निवृत्ती सेवा संघ संचालित अध्यापक विद्यालय एखतपूर डीएड परीक्षेत प्रणवराज रविराज शेटे 86.45% गुण मिळवून सांगोला तालुक्यात प्रथम तर ऐश्वर्या चंद्रकांत बनसोडे 84.45% गुण मिळवून द्वितीय तर कोमल बाळकृष्ण क्षीरसागर,81.85% गुण मिळवून विद्यालयात तृतीय आली आहे. सदर विद्यार्थ्यांचे निवृत्ती सेवा संघाचे अध्यक्ष प्रभाकर काका चांदणे प्राचार्य एम जी आलीगावे प्रा आर एस कोळेकर प्रा के आय इनामदार मॅडम पल्लवी कदम मॅडम सर्व अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments