गोडसेनीतीचा महिमा मोदीसरकार आल्यानंतर वाढला आहे - नवाब मलिक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

गोडसेनीतीचा महिमा मोदीसरकार आल्यानंतर वाढला आहे - नवाब मलिक

 गोडसेनीतीचा महिमा मोदीसरकार आल्यानंतर वाढला आहे - नवाब मलिक



मुंबई (कटूसत्य वृत्त):- गोडसेनीतीचा महिमा वाढवणे... त्याच्या विचारांना प्रोत्साहन देणे हे मोदी सरकार आल्यानंतर देशभरात हळूहळू वाढत चालले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला आहे. आठ वर्षे महात्मा गांधी यांचं नांव घेऊन नुसते कार्यक्रम करायचे. महात्मा गांधी यांचं नाव घेतलं नाही तर जग आणि देशभरात राजकारण करता येत नाही हे मोदींना मान्य आहे असेही नवाब मलिक म्हणाले. गुजरातमध्ये नथुराम गोडसे माझा नायक हा विषय समोर येत असेल तर ते योग्य नाही. आठ वर्षात गोडसेचा महिमामंडळ जोरात सुरू आहे ही सत्य परिस्थिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages