सोलापूर सोशल फाउंडेशन च्या वतीने श्रीमंती सोलापूरची पुरस्कारांचे वितरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

सोलापूर सोशल फाउंडेशन च्या वतीने श्रीमंती सोलापूरची पुरस्कारांचे वितरण

 सोलापूर सोशल फाउंडेशन च्या वतीने श्रीमंती सोलापूरची पुरस्कारांचे वितरण


                                    

                                       

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर  रेडीमेड कापड व्यापारी संघटना संस्थापक अध्यक्ष रामवल्लभ जाजू, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या चारशे एकरावर वनराई फुलवणारे प्रा. तुकाराम शिंदे, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे जहांगीर शेख (लादेन), महिला शेतकरी तथा उद्योजिका समीना मुलानी, पुरातन वस्तूंचे संग्राहक नितीन अनवेकर या पाच जणांना श्रीमंती सोलापूरची पुरस्काराने गौरविण्यात आले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटर मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती पाखर संकुल च्या अध्यक्षा शुभांगी बुवा, ज्येष्ठ कवी माधव पवार, अक्कलकोट रोड एमआयडीसी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष तिलोकचंद कासवा, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संतोष कोलते, सोलापूर सोशल फाउंडेशन संचालिका मयुरी वाघमारे- शिवगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोलापूरच्या 75 हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी या उपक्रमास सुरुवात झाली आहे. सध्या 5 व्यक्तींचा सन्मान झाला आहे. उर्वरित 70 जणांची नावे सोलापूरकरांनीही सुचवावीत अशी विनंती आहे .15 ऑगस्टपर्यंत अशा सार्थ हिऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.





No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages