उस्मानाबाद मध्ये दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्य मंडळाचे राज्य स्तरीय काव्य संमेलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

उस्मानाबाद मध्ये दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्य मंडळाचे राज्य स्तरीय काव्य संमेलन

 उस्मानाबाद मध्ये दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्य मंडळाचे राज्य स्तरीय  काव्य संमेलन



उस्मानाबद (कटूसत्य वृत्त):-  येथील  मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे उस्मानाबाद शहरामध्ये प्रथमच राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहोळा आयोजित केला आहेहे राज्यस्तरीय काव्य संमेलन रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी उस्मानाबाद शहरामधील सांजा रोडवरील संत गोरोबा काका मंदिरा जवळील जनाई मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे उदघाटन शिवसेना खासदार मा ओमराजे निंबाळकर करणार असून कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पद शिवसेना आमदार मा कैलास घाडगेपाटील हे भूषविणार आहेतया कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ राजुभैया निंबाळकरदत्ता बंडगर तसेच स्थानिक शिवसेना नगरसेवक सिद्धेश्वर कोळी उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट हे उपस्थित राहणार आहेतहे विशेष होययाच कार्यक्रमामध्ये एप्रिल महिन्यामध्ये उदगीर येथे होणाऱ्या 95 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यकार भारत सासणे याना मराठी साहित्य मंडळातर्फे साहित्य भूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेहे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. या कार्यक्रमाला नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदेसोलापूर येथील ज्येष्ठ कवयित्री डॉ रजनी दळवीकराड येथील ज्येष्ठ कवी सुरेश लोहारवर्धा येथून कवयित्री लता हेडाऊ आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेतया काव्य सम्मेलनाला राज्यातून चंद्रपूर ते मुंबईऔरंगाबाद पासून ते कोल्हापूर अशा विविध भागातून मान्यवर कवी आपल्या कविता सादर करणार आहेतनिमंत्रित कवी समवेत नवोदित कविनाही कविता सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहेमात्र ज्या इच्छुक कवींना आपल्या कविता सादर करायच्या आहेतअशा कवींनी आपली नावे नोंदणी करण्यासाठी हॉलवर सकाळी 9 वाजता उपस्थित राहून नोंदणी करायची आहेत्या नंतर येणाऱ्या कवींना संधी मिळणार नाही याची नोंद घ्यावी या कार्यक्रमाचे दिलखुलास सूत्र संचालन कवयित्री मधुरा कर्वे करणार असून निवेदन कवयित्री कृपा कुलकर्णी या करणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन मराठी साहित्य मंडळाचे शहर अध्यक्ष बाळासाहेब तिंबोळे व जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी केले आहेतरी रसिक प्रेक्षकांनी व कवींनी तसेच पुरस्कार प्राप्त कवींनी वेळेवर सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे व संपूर्ण दिवस कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावाअसे मराठी साहित्य मंडळाच्या प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages