कुर्डूवाडी नगरपरिषद प्रभाग रचना आराखड्याच्या तक्रारीची दखल.! राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 7, 2022

कुर्डूवाडी नगरपरिषद प्रभाग रचना आराखड्याच्या तक्रारीची दखल.! राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश.!

 कुर्डूवाडी नगरपरिषद प्रभाग रचना आराखड्याच्या तक्रारीची दखल.!


राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश.!

   कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी प्रस्तावित प्रभाग रचना करताना राजकीय हस्तक्षेप झाला असून प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून चुकीची प्रभाग रचना मंजुरीसाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडे प्रस्तावित केल्याबाबत ची तक्रार आर.पी.आय (आ) गटा च्या वतीने दि.२१ जाने रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.

यापूर्वी दिनांक १२ डिसेंबर रोजी च्या दैनिक कटूसत्य मध्ये कुर्डुवाडीत वार्ड रचना फुटीची रंगली चर्चा या हिडिंग खाली याबाबत वाचा फोडण्यात आली होती.यावर रिपाइंने आक्रमक पवित्रा घेत तक्रारीचा सूर उमटवित याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला


 त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सदरील पत्राची दखल घेत या प्रकरणी चौकशी करणेबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना कळवले आहे.त्यामुळे कुर्डूवाडी नगरपरिषद प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

यावर सदरची चौकशी निःपक्षपाती होन्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या महसूल विभागाकडील अधिकाऱ्याकडून करावी अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत शेंडगे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचेकडे केली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages