शिवसेनाच्या एकदिवसीय व्हाॅली बाॅल स्पर्धेचे बक्षीस वितरण
जयंत खंडागळे संघ सोलापूर प्रथम विजेता..!
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील राज्यस्तरीय एकदिवसीय भव्य व्हाॅली बाॅल स्पर्धेचे आयोजन टेंभूर्णी रोड शेंडे मळ्यात करण्यात आले होते.यावेळी जयंत खंडागळे स्पोर्ट्स क्लब सोलापुर हे प्रथम क्रमांकांचे विजेते तर जेजुरी हॉलीबॉल संघ द्वितीय आणि डोरलेवाडी हॉलीबॉल संघ तृतीय व कृषी मोहोळ संघाने चौथ्या क्रमांकांचे विजेते ठरले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या हॉलीबॉल स्पर्धा शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे पूजन करून करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भारतीय शुटींग बॉल संघाचे उपकर्णधार जयंत खंडागळे,नगराध्यक्ष समीर मुलाणी, उद्योजक महेश गांधी,कुमार गव्हाणे,मनोज धायगुडे,चंद्रकांत वाघमारे,रणजित शिनगारे,जगन्नाथ क्षीरसागर,दिलीप सोनवर,संभाजी सातव,बाबासाहेब साळवे,किसन हनवते,अयुब मुलाणी,अजित वायचळ,हरी बागल आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी प्रत्येक संघास कै. राजेंद्र गवळी यांचे स्मरणार्थ ट्राॅफी देण्यात आली.स्पर्धेसाठी प्रथम पारितोषीक पै.जब्बारशेठ मुलाणी यांच्या स्मरणार्थ २३ हजार,द्वितीय धीरज (बंटी) डिकोळे यांच्या तर्फे २१ हजार,तृतीय चेतन बबन बागल यांच्या स्मरणार्थ १९ हजार व चौथे प्रकाश गांधी यांच्या स्मरणार्थ १७ हजार सह अशी १६ पारितोषके देण्यात आली.यावेळी बेस्ट शुटर, बेस्ट नेटमन,बेस्ट डिफेन्स,मॅन ऑफ दि मॅच अशा बक्षिसांचे वाटप करण्यात आले.स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला ट्रॉफी देण्यात आली.
यावेळी पंच म्हणून बारामती शंकर सकट,सोलापूरचे उमेश फंटे यांनी कामगिरी पार पाडली. याठिकाणी दोन ग्राउंड वरती सामने पार पडले या सामन्याचे समालोचन रवी वाघमारे व उल्हास पाटील यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ खेळाडू सत्तार शेख,पी.एस.आय चिमणाजी केंद्र,पंचाक्षरी होदाडे नामदेव नवले, हनुमंत रिकीबे,अनिल बोकेफोडे,जयसिंग भांगे,प्रकाश खोत,अजय शेंडे,चंदु लोंढे,नंदु जाधव,बजरंग डांगे व दीपक जानराव,सुरेंद्र कुबेर आदींचा सन्मान करण्यात आला.
या ठिकाणी हॉलीबॉल च्या राज्यस्तरीय स्पर्धा घेता येतील या पद्धतीचे नियोजन करण्यात आल्याचे हॉलीबॉल संघाचे अध्यक्ष सावंत व बाबा संकट यांनी सांगितले.
0 Comments