भारतीय माजी सैनिक लीग संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी अरुणकुमार ताळीखेडे यांची निवड
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्याअडचणी सोडविण्यास कटिबद्ध-अरुणकुमार ताळीखेडे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2020 रोजी वाशिम येथे भारतीय माजी सैनिक लिग संघटनेची राज्य कार्यकारणी बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्यभरातून सर्व पदाधिकारी उपस्थित होते .पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी कार्यरत असलेले नायब सुभेदार एन. एन .पाटील यांनी स्वेच्छेने पदाचा राजीनामा दिला असल्यामुळे सदरचे हे पद रिक्त झाले होते. सदरच्या रिक्त पदावर नियुक्तीसाठी चर्चा करण्यात आली व चर्चेनंतर सोलापूरचे अरुणकुमार ताळीखेडे यांची विभागीय उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पदी बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती अरुणकुमार ताळीखेडे यांनी कटुसत्यशी बोलताना दिली.
या बैठकीस भारतीय माजी सैनिक लीग संघटनेचे अध्यक्ष गोपाळ वानखेडे, उपाध्यक्ष जी.के चिंचोळे, सचिव एम .जी . बिल्लेवार उपाध्यक्ष बी. जी. डांगे ,प्रादेशिक उपाध्यक्ष विष्णू डोंगरे ,शहाजी चालुक्य , एफ.पी. पाटील, प्रकाश पलांडे यांच्यासह राज्यभरातून अनेक पदाधिकारी उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्र विभागात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील माजी सैनिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न शासनापुढे मांडून शासनास माजी सैनिकांच्या अडचणींची जाण करून देणे हे प्रमुख कियापदाचे काम आहे.
अरुणकुमार ताळीखेडे हे सध्या भारतीय माजी सैनिक संघटनेचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष असून सोलापूर येथे त्यांनी राज्यस्तरीय माजी सैनिकांचा मेळावा मोठ्या दिमाखात संपन्न केला होता.मिलिटरी मध्ये कार्यरत असताना अरुणकुमार ताळीखेडे यांनी जम्मू कश्मीर ,दिल्ली, मेरट ,नागालँड, मणिपूर, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या राज्यात तसेच भारताबाहेर श्रीलंका येथे काम केले आहे.1999 च्या कारगिल युद्धातही अरुणकुमार ताळीखेडे यांचा सहभाग होता .माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्या बरोबरच ताळी खेडे हे समाजकारणात सुद्धा सक्रिय असतात.
माजी सैनिक ,सैनिक वीरपत्नी ,वीर माता -पिता , यांचे पेन्शन ,घराचे ,प्लॉट, शेतजमीन, घरकुल, नोकरी, मुलांचे शिक्षण व अवलंबितांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध असून माजी सैनिकांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू तसेच संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू.
अरुणकुमार ताळीखेडे
पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष
भारतीय माजी सैनिक संघटना.
0 Comments