समाजऋण फेडणे प्रत्येकाचे कर्तव्य : श्री काशी जगद्गुरु
वडिलांच्या स्मृतिदिनी प्रभूराज मैंदर्गीकर यांची सामाजिक बांधिलकी
वीरशैव व्हीजनमुळे 3 भावंडांना 11 हजारांची शैक्षणिक शिष्यवृत्ती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पितृऋण, मातृऋण आणि समाजऋण फेडावे लागतात. पितृऋण व मातृऋण बरोबर समाजऋण फेडणे देखील आपले कर्तव्य आहे. काशीपीठाप्रमाणे वीरशैव व्हीजनचे शिष्यवृत्ती वितरण कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
उद्योजक प्रभुराज मैंदर्गीकर यांनी आपले वडील कै. बसवराज मैंदर्गीकर यांच्या स्मृतीदिनी एक चांगले कार्य व्हावे म्हणून वीरशैव व्हीजनच्या माध्यमातून पित्याचे छत्र हरपलेल्या 3 भावंडांना 11 हजारांची रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून दिली. त्याप्रसंगी महास्वामीजी आशीर्वचनपर बोलत होते.
याप्रसंगी सुविद्या प्रकाशनचे बाबुराव मैंदर्गीकर, श्री काशीपीठ शिष्यवृत्ती विभागप्रमुख रेवणसिद्ध वाडकर, उद्योजक प्रभूराज मैंदर्गीकर, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उपस्थित होते.
याप्रसंगी भुवनेश्वरी (बी. कॉम. वर्ष 2), नंदिनी (12 वी) आणि गुरुप्रसाद (11 वी) या 3 भावंडांना शिक्षणासाठी 11 हजारांची शैक्षणिक शिष्यवृत्ती श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते देण्यात आली. त्यांचे वडील इरण्णा अतनुरे यांचे निधन झाले असून आई टोप्या शिवण्याचे काम करते. तुटपुंज्या उत्पन्नामुळे घरखर्च भागवणे आणि 3 भावंडांना शिक्षण घेणे अशक्य बनले होते. त्यांची ही अडचण राजशेखर बुरकुले यांनी प्रभूराज मैंदर्गीकर यांच्यासमोर मांडली. त्यांनी लागलीच मदतीची तयारी दर्शविली.
याप्रसंगी निर्मला अतनुरे, सोमेश्वर याबाजी, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद दुलंगे, विजय बिराजदार, राजेश नीला, चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सचिन विभुते, अमोल कोटगोंडे, सोमनाथ चौधरी, सिद्धेश्वर कोरे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments