Hot Posts

6/recent/ticker-posts

तालुक्यात विकास योजनांसाठी ७० लाखांचा निधी- शितलदेवी मोहिते पाटील

 तालुक्यात विकास योजनांसाठी  ७० लाखांचा निधी- शितलदेवी मोहिते पाटील

अकलूज (कटूसत्य वृत्त):- आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन भाजपनेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील विविध योजनांसाठी व गावांमधील पायाभूत विकासाकरिता सन २०२१ - २०२२ या वर्षां मध्ये ६९ लाख ८७ हजार ४५० रूपयांचा विकास निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी जि.प.सदस्या शितलदेवी मोहिते पाटील यांनी दिली.

लघू पाटबंधारे योजनेतून  जांबूड गुळूमकरवस्ती येथील सिमेंट बंधारा दुरुस्ती करण्यासाठी २.९० लाख मंजूर 

जि.प.शेष चौंडेश्वरवाडी येथे रस्ता करणे ५.०० लाख 

जि.नि. समिती (डी.पी.सी.)५०५४ गिरवी ते भांबुर्डी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १०.०० लाख 

जि.नि. समिती (डी.पी.सी.) ३०५४  १.गिरझणी ते संग्रामनगर ग्रा.मा. २१९ रस्त्याकरीता ७.०० लाख मंजूर 

पोलिस वसाहत बाहयावळण रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. ७.००

१५ वित्त आयोग यशवंतनगर येथील संभाजीराजे नगर येथे रस्ते व गटार  २०.०० लाख

जनसुविधा योजना  यशवंतनगर येथील संभाजीराजे नगर येथे रस्ता तयार करणे  ४.०० लाख 

नागरीसुविधा योजना यशवंतनगर येथील संभाजीराजे नगर येथे रस्ता तयार करणे  ५.०० लाख

तिर्थक्षेत्र मौजे निमगांव येथे खंडोबा मंदीर देवस्थान येथे वॉल कंपाऊड करणे. ३.०० लाख 

कृषि विभागामार्फत चॉपकटर, पानबुडी मोटर, बॅटरी स्पेपंप, ताडपत्री, वाटपा करीता २,००,२५०

महिला बालकल्याण विभागाच्या योजनेतून 

माळशिरस तालुक्यातील मौजे मोरोची कदमवाडी, वेळापूर, निमगांव, संग्रामनगर व उदयनगर गरीब गरजू महिला व मुलीना पिकोफोल, शिलाई मशिन, इत्यादी वाटप रक्कम रु.६४,००० /

समाज कल्याण विभाग २०% मागासवर्गीय माळशिरस तालुक्यातील मौजे फडतरी, मारकडवाडी मागासवर्गीय लाभार्थिना शेळी गट, व चॉपकटर वाटप रु.५०,१००/

समाज कल्याण विभाग ४०% अपंगासाठी माळशिरस तालुक्यातील मांडकी, खंडाळी, यशवंतनगर ४०% अपंग लाभार्थिना शेळी गट, मिरची कांडप, झेराक्स मशिन वाटप रक्कम रु.९९,००० हजार मंजूर

महिला बालकल्याण व समाजकल्याण विभाग एम.एस.सी.आय.टी टॅली  माळशिरस तालुक्यातील मौजे यशवंतनगर, चौंडेश्वरवाडी, माळीनगर, माळखांबी, व आनंदनगर, श्रीपूर, संग्रामनगर, खंडाळी, गिरझणी, आनंदनगर, चाकोरे गरिब व होतकरू विद्यार्थाना व विद्यार्थीना प्रक्षिण अनुदान ४७ लाभार्थी १,०८,५००/

पशुसंवर्धन विभाग माळशिरस तालुक्यातील मौजे यशवंतनगर, तामसिदवाडी, लोंढे मोहितेवाडी मिल्कींग मशिन व शेळी गट रक्कमरु.६५,६०० हजार मंजूर

माळशिरस तालुक्यातील विविध गावांच्या पायाभूत सुविधेसाठी व विविध विकास योजनेतून  ६९ लाख ८७ हजार ४५० रूपयांची १३ कामे मंजूर झाल्याची माहिती शितलदेवी मोहिते पाटील यांनी दिली. 

Reactions

Post a Comment

0 Comments