अर्धापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात माता रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन
नांदेड (कटूसत्य वृत्त):- अर्धापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक संघर्षात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा प्रतोद विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नांदेड महानगरपालिका स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव गव्हाने, शहराध्यक्ष राजू शेटे, नगरसेवक विशाल लगडे, छत्रपती कानोडे, गाजी काजी, मूकक्तदिर पठाण, नामदेव सरोदे, सलीम कुरेशी व्यंकटी राऊत, मुखस्बीर खतीब इत्यादी उपस्थित होते.
0 Comments