औषधे विक्री व्यसायाकरिता पार्टनरशिपमध्ये गुंतवविलेली पन्नास लाख रुपये इतक्या
रक्कमेच्या फसवणुकीच्या गुन्हातुन आंध्रपदेशातील आरोपीची जामिनावर मुक्तता
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विजयवाडा, आंध्रप्रदेश भागातील श्री. गिरीनाथ कोटा यांनी फिर्यादी रमेश कोटा कडुन औषधेविक्री व्यवसायासाठी रक्कम रुपये पन्नास लाख रुपये एवढी रक्कम फसवणुकीच्या आरोपातुन आरोपी गिरीनाथ कोटा रा. विजयवाडा, आंध्रप्रदेश. यांना भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०, ४०६ व ३४ अन्वये गुन्हयातुन सोलापुर येथील मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट श्री. व्हि. आय. भंडारी न्यायाधिश साहेबांनी पंचवीस हजार रुपयेच्या सॉलव्हन्सी जामिनवर मुक्तता केली. यात आरोपीतर्फे अँड. श्रीनिवास कटकूर, अँड किरण कटकुर, यांनी काम पाहिले.
यात सविस्तर हकीकत अशी की, विजयवाडा, आंध्राप्रदेश भागातील गिरीनाथ कोटा यांनी फिर्यादी चुलत भाऊ रमेश कोटाकडुन औषधेविक्री व्यवसायासाठी रक्कम रुपये पन्नास लाख एवढी रक्कम ऑनलाईन व रोख स्वरुपात रक्कम स्विकारुन आरोपी व त्याचे वडिल सत्यनारायण कोटा यांनी सदर रक्कम व्यवसायासाठी न वापरता स्वत:करिता वापरुन फिर्यादीची फसवणुक केल्याबाबत फिर्यादी हा अश्या आशयाची फिर्याद सदर बझार पोलिस स्टेशन सोलापुर येथे भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०,४०६ व ३४ अन्वये फिर्याद सन २०१९ मध्ये तक्रार दिलेली होती. व तब्बल दोन वर्षापासुन आरोपी हा फरार होता. व सदर आरोपीस सदर बझार पोलिसांनी विजयवाडा, आंध्रप्रदेशवरुन पंधरा दिवसापुर्वी
पोलिसांनी आरोपीस अटक करण्यात आलेली होती. व आरोपीस मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जज्ज भंडारी साहेबांकडे हजर करण्यात आले होते. व आरोपीतर्फे ॲङ श्रीनिवास कटकूर, ॲङ किरण
कटकुर, यांनी हजर राहुन आरोपीतर्फे जामिन मिळण्यासाठी कलम ४३८ अन्वये जामीन अर्ज दाखल करुन आरोपीतर्फे युक्तीवादमध्ये असे मत मांडले की, फिर्यादी हा आरोपीस व्यवसायापोटी देणी रक्कम दयावयाची होती व ती रक्कम फिर्यादी हा आरोपीस ऑनलाईन पध्दतीने दाखवुन फसवणुकीची केस फिर्यादीने चुकीच्या पध्दतीने खोटा गुन्हा पोलिसात दाखल केला. व फिर्यादी व आरोपी हे दोघे चुलत भाऊ आहेत व घरगुती वादातुन खोटे केस आरोपी विरुध्द दाखल केलेला आहे. व सदर गुन्हात आरोपीचा प्रत्यक्ष संबंध नाही. असा युक्तीवाद आरोपीचे वतीने अँङ श्रीनिवास कटकुर, ॲङ किरण कटकुर यांनी केला. व या सर्व बाबींचा विचार करुन मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट न्या. व्हि. आय. भंडारी जज्ज साहेबांनी सदर आरोपीस पंचवीस हजार रुपयेच्या सॉलव्हन्सी जामिनावर मुक्तता केली.
याकामी आरोपी तर्फे अँड. श्रीनिवास कटकुर, अँड.किरण कटकुर, ॲङ सर्फराज शेख, ॲङ सोनाली कटकुर यांनी काम पाहिले. तर सरकार तर्फे ॲङ ढोके यांनी काम पाहिले.
0 Comments