Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचा संघटनात्मक पाया भक्कम : सुप्रिया गुंड पाटील

 सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचा संघटनात्मक पाया भक्कम : सुप्रिया गुंड पाटील 


सांगोला येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारणीचा विस्तार 


सांगोला (कटूसत्य वृत्त):- स्थापनेपासून राज्यात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष सातत्याने सत्तेचा एक अविभाज्य भाग असल्याने पक्ष नेतृत्वाला संघटनात्मक कामाकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. तरीही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष, मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्याच्या उपाध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचा संघटनात्मक पाया खूप भक्कम असल्याचे विधान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष सुप्रिया गुंड-पाटील यांनी केले.


शनिवार दि 5 फेब्रुवारी रोजी सांगोला येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारणी चा विस्तार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावासाठी महिला गावप्रमुख, पंचायत समिती गणासाठी महिला गनप्रमुख, जिल्हा परिषद गटासाठी महिला गटप्रमुख, तसेच तालुका उपाध्यक्ष, व शहर उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आदी पदांवर तब्बल १२५ हून अधिक महिलांची नियुक्ती करून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष, मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा निरीक्षक दीपालीताई पांढरे, रंजना हजारे, तालुका अध्यक्ष सखुबाई वाघमारे, शहर अध्यक्ष शुभांगी पाटील, डॉ. पियुष साळुंखे पाटील, डॉ.नेहा साळुंखे पाटील, तानाजीकाका पाटील, विश्वनाथ चव्हाण, चंद्रकांत चौगुले, अनिल खडतरे आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष पदी जयश्री पाटील, हसीना मुलाणी, सोनाली शिंदे, रुक्मिणी वायदंडे, लक्ष्मी मिसाळ, वंदना धांडोरे यांची तर सल्लागार म्हणून ॲड.चैत्रजा बनकर तर सह खजिनदार पदी जयश्री सावंत सरचिटणीस पदी चंद्रभागा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली तसेच महूद जिल्हा परिषद गटासाठी गटप्रमुख म्हणून शोभा महाजन, एखतपूर गटासाठी सुवर्णा जाधव, जवळा गटासाठी चारुशीला साळुंखेे, कडलास गटासाठी धनश्री गव्हाणे, नाझरे गटासाठी रंजना हरिहर, कोळा गटासाठी नकुसा मोरे व रेश्मा तांबोळी, यांची तर घेरडी जिल्हा परिषद गटासाठी शबाना आतार यांची नेमणूक करण्यात आली. पंचायत समिती गण प्रमुख म्हणून चिकमहुद साठी जयश्री पुजारी, महूद इंदुताई बागल, एखतपूर सुमित्रा पाटील, वाकी शिवने सत्यशीला माने, जवळा सत्यभामा गडहिरे, वाढेगाव नंदादेवी वाघमारे, कडलास मंगल चव्हाण, अजनाळे अनिता पवार, नाझरे नंदा कुंभार, उदनवाडी अर्पिता दोडके, कोळा काजल चव्हाण, जुनोनी संगीता वाघमारे, घेरडी अंजिरा गंगणे तर सोनंद गणासाठी शकुंतला काशीद यांची पंचायत समिती गणप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावासाठी गाव प्रमुख म्हणून महिलांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या.

सांगोला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून श्रीमती भामाबाई जाधव, मंगल खाडे, सुजाता कांबळे, ज्योती उघाडे, अमृता शिर्के व सरस्वती रणदिवे यांची तसेच सचिवपदी शकुंतला खडतरे तर खजिनदारपदी वनिता बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आहे तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून प्रत्येक प्रभागातून व बूथमधून महिलांची नेमणूक करण्यात आली आहे. गावप्रमुख, गणप्रमुख व गट प्रमुख तसेच तालुका उपाध्यक्ष व शहर उपाध्यक्ष पदासह अन्य पदांवर नियुक्ती झालेल्या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र, गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


संघटनात्मक कामाचा राज्यापुढे आदर्श निर्माण करू 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यकारणीसह महिला, विद्यार्थी, पदवीधर, अल्पसंख्यांक तसेच सर्व सेल व आघाडीचे तळापासून काम करून आपण सांगोला तालुक्यात पक्षाचा पाया व विचार भक्कम केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार व भूमिका तालुक्यातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून शरदचंद्रजी पवार साहेबांना संघटनेचे जे काम अपेक्षित आहे, ते आपण करून दाखवू व संघटनात्मक कामात सांगोला तालुक्याचा आदर्श राज्यापुढे निर्माण करू ; 

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.



साळुंखे-पाटील बंधु-भगिनींची पक्षाप्रती निष्ठा उल्लेखनीय

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या काम करत असताना आपण राज्यभर प्रवास केला. पक्षाप्रती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील व त्यांच्या भगिनी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड या दोन बंधू-भगिनीची असलेली निष्ठा, समर्पणाची भावना व त्याग राजकारणात खूप अपवादाने पाहायला मिळतो. या दोन बंधू-भगिनींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपण नेहमी काम करतो ; 

दिपालीताई पांढरे

निरीक्षक ; राष्ट्रवादी महिला काँग्रेस, सोलापूर.



बंडातात्या कराडकर यांचा तीव्र शब्दात निषेध 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे व भारतीय जनता पार्टीच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व स्वतःला वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणविणाऱ्या बंडातात्या कराडकर यांनी सुप्रियाताई व पंकजाताई यांचा अवमान केला नाही तर, सबंध महिलांच्या भावना त्यांनी दुखावल्या आहेत. अशा प्रवृत्तीचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत ही आपल्या राज्याची संस्कृती नाही. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घातला पाहिजे. अन्यथा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तीव्र आंदोलन करेल

जयमालाताई गायकवाड

प्रदेश उपाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

Reactions

Post a Comment

0 Comments