Ads

Ads Area

सांगोला पोलीस स्टेशनचे डी. बी.पथक नावालाच; पी.आय.साहेबांचा दरारा भारी,पण डी. बी.वाल्याची चाल न्यारी

 सांगोला पोलीस स्टेशनचे डी. बी.पथक नावालाच

पी.आय.साहेबांचा दरारा भारी,पण डी. बी.वाल्याची चाल न्यारी


सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला पोलीस स्टेशन मधील गुन्हे शाखा अर्थातच डी. बी.पथक नावालाच असल्याचे जनमानसातून बोलले जात आहे.या उलट सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचा अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर दरारा आहे.पण ज्या कार्यासाठी डी. बी.पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली  आहे. तेच कर्तव्य " डिटेकटीव्ह ब्रँच" मधील पोलीस कर्मचाऱ्यांना विसर पडलेला दिसून येत आहे. "कारभारी भारी,पण कर्मचाऱ्यांचे वागणे न्यारी"अशीच चर्चा नागरिकांतून चर्चिली जात आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांची उचल बांगडी पोलीस मुख्यालयात करण्याची मागणी जनतेतून होत आहे.या पथकात पाच पोलीस कर्मचारी आणि एक सहायक पोलीस निरीक्षक कार्य पहात आहेत.

      "डिटेकटीव्ह ब्रँच" अर्थातच गुन्हे प्रकटीकरण शाखेचा पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात मोलाचा वाटा असतो.घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेवून गुन्ह्यांची टक्केवारी कमी  करण्यात महत्वाची भूमिका डी. बी पथकाची असताना सांगोला पोलीस स्टेशन चे डी. बी पथक मात्र नावापुरतेच असल्याची चर्चा नागरिकांतून चर्चिली जात आहे.कारण सांगोला आठवडा बाजारातील मोबाईल चोरीच्या घटना असतील,वाढत्या घरफोडीच्या घटनांची संख्या लक्षात घेता डी बी पथक सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

     सांगोला शहर आणि ग्रामीण भागात सुरू असणारे अवैध धंदे,त्यामध्ये प्रामुख्याने दारू,गुटखा,मटका,जुगार ,टायगर गेम ,लॉजिग इ खुलेआम  चालू आहेत.याकडे डी बी पथकातील कर्मचारी कानाडोळा करीत असल्याचे नागरिकांतुन बोलले जात आहे. बोटावर मोजण्याइतपत गुन्हे सोडले तर अजूनही काही गुन्ह्यांची उकल या पथकाला करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी मुख्यालयात करावी,अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. येणाऱ्या काळात तरी या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून दमदार कामगिरी सांगोला वासीयांना अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close