काँग्रेसचा आणखी एक माझी महापौर राष्ट्रवादीत! निवडणुकीपूर्वीच धक्का - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 18, 2022

काँग्रेसचा आणखी एक माझी महापौर राष्ट्रवादीत! निवडणुकीपूर्वीच धक्का

 काँग्रेसचा आणखी एक माझी महापौर राष्ट्रवादीत! निवडणुकीपूर्वीच धक्का

                                     

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका निवडणुकीत सत्ता आमचीच म्हणत कॉंग्रेस नेते महापौरपदाची स्वप्न रंगवू लागले आहेत. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने विशेषत: महेश कोठे, दिलीप कोल्हे, मनोहर सपाटे, भारत जाधव, संतोष पवार, जुबेर बागवान, पद्माकर काळे, किसन जाधव, महेश गादेकर या नेत्यांनी एमआयएमचे तौफिक शेख, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांच्यासह आणखी काही नेत्यांना, आजी-माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात आणण्याचे नियोजन सुरु केल्याची चर्चा आहे. कोठेंनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना राष्ट्रवादीत आणले. आता माजी महापौर ऍड. यु. एन. बेरिया हे राष्ट्रवादीत दाखल होऊ लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी असतानाही शहरात मात्र, राष्ट्रवादीकडून कॉंग्रेस व शिवसेनेतील नाराजांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा आहे. या सर्व दिग्गज नेत्यांचे डावपेच ओळखून पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांना टिकवून ठेवण्याचे आव्हान शहरातील पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे. तौफिक शेख व त्यांचे समर्थक मुस्लिम नगरसेवक आणि आता ऍड. यु. एन. बेरिया व त्यांना मानणारे नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेल्यांनतर नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या माध्यमातून कॉंग्रेसला मुस्लिम व्होट बॅंक सांभाळावी लागेल. नाहीतर, प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागेल, असे बोलले जात आहे. आमदारकीची हॅट्रिक साधणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात मुस्लिम समाजाचा निर्णायक वाटा राहिला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तौफिक शेख व महेश कोठे यांच्या उमेदवारीमुळे प्रणिती शिंदेंसमोर कडवे आव्हान होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत फारुख शाब्दी, महेश कोठे व दिलीप माने यांच्याशी त्यांचा सामना झाला. त्यावेळी मुस्लिम समाज प्रणिती शिंदेंच्या पाठिशी उभारला आणि त्यांचा विजय झाला. या मतदारसंघात मुस्लिम समाज मोठा असून कॉंग्रेसकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाल्यास एमआयएमची वाढ होणार नाही, असा विश्‍वास ऍड. बेरियांना वरिष्ठ नेत्यांना दिला होता. त्याचवेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीकडे गेल्याने मोहोळ मतदारसंघातून आमदार प्रणितींनी निवडणूक लढवावी, अशीही मागणी मुस्लिम नेत्यांनी केली. तरीही, पक्षाकडून त्याचा गांभीर्याने विचार झाला नाही. या पार्श्‍वभूमीवर ऍड. बेरियांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याची चर्चा आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages