मंगळवेढ्यात केंद्रीय पथकांचा दौरा; डाळिंबाची परिस्थिती चिंताजनक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 18, 2022

मंगळवेढ्यात केंद्रीय पथकांचा दौरा; डाळिंबाची परिस्थिती चिंताजनक

 मंगळवेढ्यात केंद्रीय पथकांचा दौरा; डाळिंबाची परिस्थिती चिंताजनक


मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- रोगाने ग्रस्त झाल्यामुळे तालुक्यातील डाळिंब बागाची परिस्थिती चिंताजनक आहे. त्याबाबत सद्यस्थितीचा अहवाल केंद्र शासनाला सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय पथकाने मंगळवेढा खुपसंगी दौर्‍यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची संवाद साधताना व्यक्त केले. तालुक्यातील डाळिंब बागाची परिस्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांना आधाराची गरज असल्याचे वृत्त दैनिक सकाळने प्रसिद्ध केले होते शिवाय मोर्फोचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्याची भेट घेऊन याबाबत मदतीची मागणी केली. त्याच अनुषंगाने आज केंद्रीय पथकाने तालुक्याचा दौरा केला. या दौर्‍यात डॉ किरण देशकर जॉईंट डायरेक्टर, किटकशात्रज्ञ डॉ राघवेंद्र देवरमनी, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे प्रमुख डॉ राजीव मराठे, डॉ मल्लिकार्जुन, सचिन शिरसाट व युवराज शिंदे, कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, मंडळ कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे, मारुती कौलगे, अर्जुन बिराजदार,सागर गवळी,राजाराम तळेकर प्रशांत काटे,महादेव उबाळे, वालचंद भोई, मनीषा कव्हळे, शहाजी गावडे, हनुमंत शिंदे, अभिजित तावदार, नितीन पवार, नूतन अंकुश पडवळे मोहन माळी, दामोदर जाधव, संभाजी जाधव ज्ञानेश्वर जाधव, सावंजी व शेतकरी उपस्थित होते. सुरुवातीला मंगळवेढा रोड, पाटकळ रोड, खुपसंगी आदी गावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाहणी केली. या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना कोरोनामुळे सर्व शासकीय कामकाज थांबल्यामुळे डाळिंबी वरील अनेक रोगांवरील उपाययोजनाची माहितीपत्रक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास पोचण्यास उशीर झाला. डाळिंब पिकाला असणारे रोग चे सर्व जुने रोग आहेत फक्त वातावरणात बदल घडल्यामुळे या बदलत्या वातावरणात फवारणी अपेक्षित होत्या त्या फवारणी विलंब झाल्यामुळे बागा या रोगाला बळी पडल्या.तेल्या रोगावर अलीकडच्या काळात नियंत्रण मिळवल्यामुळे डाळिंबाच्या उत्पादन व क्षेत्रासह उत्पादकतेत वाढ झाली. यंदाच्या हंगामामध्ये विविध रोगांनी 70 टक्के बागा ग्रस्त झाल्या असून .उर्वरीत बागा जतन करण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राने शिफारस केल्या प्रमाणे औषधी फवारणी करून रोग नियंत्रण करण्याचे आवाहन या पाहणी दरम्यान व्यक्त केले. काही शेतकऱ्यांनी चुकीची औषधे फवारणी केल्यामुळे अनेक प्रभावी औषधांच्या मात्रा या डाळिंब रोगाला लागू पडल्या नाहीत. डाळिंब पिकाला असणारे रोग हे गृहीत धरुन शेतकऱ्यांनी डाळिंब संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या औषधाच्या मात्रा फवारणी वेळेत करावेत असे सूचना यावेळी तज्ञांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages