दूध संघाची 26 फेब्रुवारीला निवडणूक! नेत्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 17, 2022

दूध संघाची 26 फेब्रुवारीला निवडणूक! नेत्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला

 दूध संघाची 26 फेब्रुवारीला निवडणूक! नेत्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी क्रियाशिल संस्था सभासद प्रतिनिधी (सर्वसाधारण), महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग, ओबीसी व भटक्‍या विमुक्‍त जाती-जमाती व विशेष प्रवर्ग, अशा 17 जागांसाठी 87 उमेदवार रिंगणात होते. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी (मंगळवारी) 55 जणांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला. त्यामुळे आता दूध संघाच्या 16 जागांसाठी 31 उमेदवारांचे 32 अर्ज आहेत. नेत्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अडचणीत असलेल्या दूध संघाला पुन्हा उर्जितावस्था आणण्याच्या दृष्टीने ही निवडणूक खूप महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीनंतर दूध संघावर पुन्हा एकदा संचालक मंडळ दिसेल. तत्पूर्वी, दूध संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, प्रशांत परिचारक, माजी आमदार दिलीप सोपल, राजन पाटील, दिलीप माने यांच्यासह सर्वच नेत्यांनी बैठका घेतल्या. तरीही, बचाव पॅनलने त्यांची मागणी सोडली नाही. परंतु, ओबीसी प्रवर्गातून आपला उमेदवार बिनविरोध करण्यात नेत्यांना यश मिळाले. आता क्रियाशिल संस्था सभासद प्रतिनिधीच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी त्यांना ताण काढावा लागणार आहे. आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजिव व आमदार संजय शिंदे यांचे पुतणे रणजितसिंह शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश सोपल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची सून वैशाली जितेंद्र साठे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. न्यायालयाच्या निकालामुळे दिलीप माने यांनी निवडणुकीत माघार घेतली. वैशाली साठे या अपक्ष म्हणून महिला प्रतिनिधीतून स्वतंत्रपणे लढत आहेत. चिन्हासह उमेदवारांची यादी उद्या (बुधवारी) सकाळी 11 वाजता प्रसिध्द होणार असून 26 फेब्रुवारीला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास पॅनलचे 16 जागांसाठी 16 उमेदवार निवडणूक लढवित असून तीन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधीच्या दोन जागांसाठी सात महिला रिंगणात असून त्यात या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 27 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. महाविकास पॅनलचे उमेदवार क्रियाशिल संस्था सभासद प्रतिनिधीच्या 12 जागांसाठी रणजितसिंह शिंदे, योगेश सोपल, बाळासाहेब माळी, बबनराव आवताडे, संभाजी मोरे, राजेंद्र मोरे, मनोज गरड, मारुती लवटे, विजय यलपल्ले, औदुंबर वाडदेकर, अलका चौगुले, वैशाली शेंबडे हे तर महिला प्रतिनिधीच्या दोन जागांवर निर्मला काकडे व छाया ढेकणे यांना उमेदवारी मिळाली आहे. अनुसूचित जाती-जमातीमधून जयंत साळे तर भटक्‍या विमुक्‍त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एका जागेसाठी राजेंद्रसिंह पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages