सुप्रसिद्ध ज्योतिषी ‘आचार्य धर्मराज गुरुजी’ यांची हॉटेल सुनील येथे सदिच्छा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 14, 2022

सुप्रसिद्ध ज्योतिषी ‘आचार्य धर्मराज गुरुजी’ यांची हॉटेल सुनील येथे सदिच्छा भेट

 सुप्रसिद्ध ज्योतिषी ‘आचार्य धर्मराज गुरुजी’ यांची हॉटेल सुनील येथे सदिच्छा भेट


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भारतातील सुप्रसिद्ध ज्योतिषी, रत्नशास्त्रज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ याबरोबरचं आजच्या युवापिढीचे प्रेरणास्थान असलेले ‘आचार्य धर्मराज गुरुजी’ यांनी उद्योजक सुनील वाघमोडे यांच्या हॉटेल सुनील  येथे सदिच्छा भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी हॉटेलच्या उत्कृष्ट पदार्थाबद्दल व नियोजनाबद्दल कौतुक केले.


सर्वतोपरी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करीत असलेले आचार्य धर्मराज गुरुजींनी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीचे वर्णन करताना ‘अतिथि देवो भव!’ असे उदगार काढून, द्विगुणित आनंदासह आपल्या प्रेमळ भावना सुप्रसिद्ध हॉटेल सुनील याचे मालक सुनील वाघमोडे यांनी व्यक्त केल्या.


यावेळी हॉटेल सुनील चे मालक सुनील वाघमोडे, चंद्रशेखर वाघमोडे, प्रेम वाघमोडे, अनिल वाघमोडे, कुबेर वाघमोडे,  रोहित वाकडे, अभिमान वाघमोडे, श्रीनिवास वाघमोडे यांनी त्यांचा सत्कार केला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages