कुर्डूवाडीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.!
आदर्श मध्ये कोविड योद्धा सन्मान सोहळा संपन्न.!
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- आदर्श पब्लिक स्कूलमध्ये ७३ वा प्रजासत्ताक औचित्य साधून कुर्डूवाडी शहर आणि परिसरातील डॉक्टरांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी विद्यार्थ्याने देशभक्तीपर समूहगीत,भाषणे,आर्मी थीम,भारता समोरील आव्हाने यावर चर्चा.लेझीम इत्यादी सादरीकरण करण्यात आले.
यावेळी डॉ.शिवाजी थोरात,डॉ.नवजीवन शहा,डॉ.जयंत करंदीकर,डॉ.संतोष कुलकर्णी,डॉ.रोहिणी कुलकर्णी,डॉ. लकी दोशी,डॉ हर्षल शहा,डॉ.प्रद्युम्न सातव,डॉ.एस,एस रणदिवे,डॉ.अंकुश कुंभार,डॉ.सचिन माढेकर,डॉ.लक्ष्मी माढेकर,डॉ.संतोष सुर्वे,डॉ.नागश्री दोशी,डॉ.बाहुबली दोशी,डॉ.पराग बिनाकिया,डॉ.कलीम कोरबू,डॉ.अनिल वायकुळे,डॉ.सुशिल खांडवीकर,डॉ.रवींद्र देवकते,सिस्टर सुनीता गिराम,प्रताप ठुबे,सिस्टर. संध्या ठुबे आदींना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कुर्डूवाडी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक अधिकारी तुकाराम पायगण यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी भारता समोरील आव्हाने या मध्ये अंधश्रद्धा,बेरोजगारी,काळा पैसा,अशिक्षितपणा या विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेले चर्चासत्र कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण केले गेले त्याद्वारे ९५० विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचा घरून सहभाग घेतला.प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक,विभाग प्रमुख उपस्थित होते.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
0 Comments