Hot Posts

6/recent/ticker-posts

रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

    


पुणे (कटूसत्य वृत्त):- काँग्रेस युवा नेते व स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन भैय्या  सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. २६ जानेवारी रोजी वाढदिवसाचे औचित्य साधत पुणे येथे नामांकित हॉस्पिटलमध्ये भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात गोरगरीब व गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तर राज्याच्या विविध भागातही गोरगरीब व निराश्रितांना अन्न दान, शाल,फळे,मिठाई,मास्क तर विविध वृध्दआश्रमातही सामाजिक उपक्रम राबविले.  स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉंग्रेस युवा नेते रोहन सुरवसे पाटील हे  कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सतत विविध असे सामाजिक उपक्रम राबवत असतात.ते  सतत गोरगरिबांना मदतीचा हात देत आहेत तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करणे, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणे,विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करणे, वृद्ध आश्रमात जाऊन अन्न दान करणे,बेघर निराश्रित गोरगरिबांना अन्नदान करणे, असे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. यामुळे रोहन सुरवसे पाटील यांना दिल्ली येथे एका नामांकित संस्थेच्या वतीने मीराताई कुमारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.तसेच राज्यातील ही विविध सामाजिक संस्थेने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 26 जानेवारी रोजी रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस असतो.त्यांचे  वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघटनेने राज्याच्या विविध भागात व पुणे परिसरात गोरगरिबांना मिठाई, मास्क, शाल, अन्न दान, वाटप करून कर्तुत्ववान युवा नेत्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी अधिष्ठान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पै.अनिल सुरवसे पाटील,तसेच अक्षय थोरात,मयूर भाडळे, रणजित काळे, कुणाल भोगम,सूरज धुमाळ, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष तुषार ननवरे, महावीर कांबळे, गणेश वायदंडे, सुबोध  सोनटक्के तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य यांनी अधिक परिश्रम घेतले.  




Reactions

Post a Comment

0 Comments