Hot Posts

6/recent/ticker-posts

आता रेशन कार्ड वर मिळणार स्वस्तात पेट्रोल! 'या' लोकांना होणार फायदा

आता रेशन कार्ड  वर मिळणार स्वस्तात पेट्रोल! 'या' लोकांना होणार फायदा 



मुंबई (कटूसत्य वृत्त):-  केंद्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांना किराणाव्यतिरिक्त इतर अनेक सुविधा दिल्या जात आहे. या सुविधांमुळे आता रेशन कार्डधारकांना मोठा फायदा मिळत आहे. त्यामुळे तुमच्याकडेही रेशनकार्ड असेल तर या सरकारी सुविधा आणि योजनांचा लाभ घेता येईल.मात्र रेशन कार्ड धारकांसाठी आता एक फायद्याची योजना सुरु करण्यात येत आहे. ही योजना म्हणजे रेशनकार्डवर तुम्हाला सवलतीच्या दरात इंधनाची सुविधा मिळणार आहे. जाणून घेऊन नेमकी ही सुविधा काय आहे. देशातील रेशनकार्ड धारकांना अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळतो. अशात झारखंड सरकारने राज्यातील रेशन कार्डधारकांना २६ जानेवारीपासून स्वस्त दरात पेट्रोल दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. यामुळे जवळपास २० लाख लोकांना फायदा मिळणार आहे. यासाठी झारखंड सरकारने पेट्रोल सबसिडी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ फक्त रेशव कार्डधारकांनाच घेता येईल. या योजनेअंतर्गत लाल, पिवळे आणि हिरवे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्यांचे रेशन कार्ड खराब किंवा रद्द झाले अशांना याचा लाभ घेता येणार नाही. तसेच सध्या वापरात असलेल्या रेशनकार्ड धारकांनाच याचा फायदा मिळणार आहे. याशिवाय ज्यांच्याकडे झारखंड राज्य नोंदणीचे दुचाकी वाहन आहे तेही याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत दर महिना २५० रुपये थेट अकाऊंटमध्ये हस्तांतरित केले जातील. या पेट्रोल सबसिडी योजनेअंतर्गत रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना महिन्याला १० लिटर पेट्रोलमागे २५  रुपयांची सबसिडी दिली जाईल. यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदी करताना पूर्ण रक्कम भरावी लागेल त्यानंतर महिन्याच्या शेवटी २५० रुपये तुमच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतील. 
Reactions

Post a Comment

0 Comments